
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात हेद्राबाद ते नागपूर महामार्गावर पांढरकवडा ते हिंगणघाट दरम्यान मोठ मोठेखड्डे पडले आहे हा मार्ग झाला तेव्हापासून कुठलीही दुरुस्ती नाही दररोज हजारो वाहने ये जा करतात टोल वसुली जोरात सुरू आहे परंतु पडलेल्या खड्याकडे कोणाचेच लक्ष नाही .कुठलाही पश्न घेऊन महामार्गावर रास्ता रोको करणारी सर्वच पक्षाची नेते मंडळींना पडलेले खड्डे दिसत नाही का?प्रश्न पडतो .आता पर्यंत मोजता येणार नाही एव्हडी अपघाताची प्रकरणे घडली आहे .कित्येकाला आपला जीवही गमवावा लागला आहे .मोठी वाहने रात्र दिवस वाहतूक करताना लोडिंग च्या वाहनांना रस्त्यावरील खड्डे कसे चुकवता येईल तसा प्रयत्न करणाऱ्यां वाहनावर पलटी होण्याशिवाय पर्याय राहिले नाही .खाजगी वाहने कुटूंबा सह कार्यक्रमाला गेलेली खड्यामुळे अपघात झाल्याने मोडतोड झाले आहे .वेगाने असलेल्या वाहनांना खड्डे दिसतच नाही अशी वाहने खड्यातून उसळून रस्त्याच्या बाजूला जाऊन पडलेली दिसली आहे . सद्य स्थितीत पावसाळ्याचे दिवस आहे खड्डे पडल्याने यात पावसाचे पाणी साचून राहते ते वाहन चालकाला दिसत नाही वेळेवर वाहनावर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याची बरीच उदारणे ठाणेदार विनायकराव जाधव यांनी सांगितले आहे .ते म्हणतात कि एकही असा दिवस नाही की अपघाताचा फोन येत नाही आम्हाला चोवीस तास सतर्क राहावं लागतं .अपघात झालेली वाहने त्यांनी पोलीस स्टेशनला दाखवली .जास्त वाहतूक असणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाकडे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी लक्ष देतील का कारण ते नागपूर विदर्भातीलच आहे .ते नुकतेच मागच्या महिन्यात हिंगणघाटच्या ब्रिज चे लोकार्पण करण्या साठी आले होते .रस्ते तेही राष्ट्रीय महामार्ग जर खड्डे मय असतील तर ग्रामीण भागातील रस्त्याची चर्चाच नको असे काही महाभाग म्हणतात त्यांचे बरोबरही आहे .काही ठिकाणी थातूर मातूर दुरुस्ती चे काम सुरू आहे परंतु एव्हढ्या मोठ्या खड्याची दुरुस्ती होऊच शकत नाही लोक भावनेचा व वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांच्या कुटूंबाचा विचार करून हा पांढरकवडा ते हिंगणघाट राष्ट्रीय क्रमांक सात महामार्ग पूर्णतः नवीनच करावा अशी मागणी सर्वत्र होत आहे .
