रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे मानवतेचे सेवक डॉ. दिनेश जयस्वाल


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ


डॉक्टर म्हणजे देवाचे दूत ही म्हण ढाणकी चे डॉ. दिनेश जयस्वाल यांनी आपल्या कर्तृत्वाने खरी करून दाखवली आहे.हिंदू धर्मात सगळ्यात पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना. या महिन्यात हिंदू समाजात देवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास, देवाचे भजन, कीर्तन, पूजा-अर्चा व स्मरण करतात. पण डॉ. दिनेश जयस्वाल आपल्या पारंपरिक चाली – रुढी यांना दुजोरा न देता ,रुग्णाची जात -पात न पहाता ते आपल्या दवाखान्यात दर वर्षी पवित्र अश्या श्रावण महिन्यात गरजू व गरीब रुग्णांचा मोफत इलाज करतात. तसेच त्यांनी कमोड चेअर, वाॅटर बेड, वॉकर, हाॅट वॉटर बॅग हे गरजू रुग्णांना वापरण्यासाठी तसेच शालेय मुलांना सायकल वापरण्यासाठी अगदी मोफत देण्याचा उपक्रम सुध्दा ते राबवतात.
परंतु सलाईन लावल्यास केवळ १००रुपये घेतात. त्यांनी दिगंबर अमृते बुवाजी हे दत्त मंदिराचे पुजारी असतांना दत्तात्रय प्रभू यांच्या यात्राच्या वेळी येणारे भक्त- रुग्ण तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या शिबिरात सुध्दा विना मूल्य सेवा आणि स्वतः जवळील औषधी दिल्या. एवढंच काय मतदानाचे कर्तव्य बजावलेल्या नागरिकांचा
सुद्धा त्यादिवशी त्यांच्या दवाखान्यात मोफत इलाज केला जातो.यातून ते रुग्णांना मतदानचे महत्व पटवून देतात.
कोरोना’चा हाहाकार असतानांही कोरोनाच्या भीतीला न जुमानता. डॉ. दिनेश जयस्वाल यांनी नेहमीप्रमाणे श्रावण महिन्यात पण रुग्णांची मोफत सेवा केली.
आज ही ते दरवर्षी प्रमाणे अधिक श्रावण मास व श्रावण महिन्यामध्ये अशी दोन महिने आपली सेवा सुरु ठेवली आहे.
चौकट
डॉक्टर दिनेश जयस्वाल म्हणतात…
त्यांचा दवाखाना मोठा झाल्यावर ते एक वर्ष रुग्णांची याप्रकारे मोफत इलाज करतील! आणि श्रावण महिन्यात गेल्या २० वर्षापासून करत असलेली ही सेवा ते निरंतर अशीच मोफत सेवा देत राहतील . अशा या मानवतेच्या डॉक्टर ला सलाम….!