शासन आपल्या दारी’ कार्यक्रमामध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालय राळेगाव अव्वल

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

     

तालुका कृषी अधिकारी राळेगाव यांच्या मार्फत शेतकरी करिता विविध योजनेचा लाभ दिला जातो.त्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजना येते.तालुका कृषी अधिकारी कार्यालय राळेगाव यांच्या मार्फत शेतकऱ्यांना अनुदान वितरणचा धनादेश व प्रमाणपत्र करिता मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्याकरिता तालुका कृषी अधिकारी राळेगाव यांचे शेतकरी लाभार्थी व हार्वेस्टर ,बहुपीक मळणी यंत्र व सहा ट्रक्टर शासन आपल्या दारी कार्यक्रम मध्ये उपस्थित केले .सदर हा कार्यक्रम मुख्यमंत्री मंडप च्या पाठीमागे आयोजित केला होता .
राळेगाव तालुक्यातील चिखली येथील युवा शेतकरी ऋषिकेश नामदेव उमाटे यांना रुद्रा कंपनीचे बहुपीक मळणी यंत्र करिता रुपये दोन लाख चा धनादेश व प्रमाणपत्र मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला ,तसेच मुख्यमंत्री मंडप च्या पाठीमागील असलेले यंत्र व ट्रक्टर उपस्थित होते त्या वेळेस मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते श्री. विनोद यादव पावडे राळेगाव यांच्या महिंद्रा जिओ ट्रक्टर ची चाबी देण्यात आली.
सदर कार्यक्रम करिता मा.डॉ.पंकज आशिया जिल्हाधिकारी मा.श्री.किसनरावजी मुळे विभागीय कृषी संचालक अमरावती .मा.श्री.प्रमोदजी लव्हाळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळ ,.मा. श्री.संतोषराव डाबरे प्रकल्प संचालक (आत्मा) , मा.तेजस चव्हाण उपविभागीय कृषी अधिकारी ,मा.श्री जगनभाऊ राठोड उपविभागीय कृषी अधिकारी यवतमाळ,श्री.अमोलजी जोशी तालुका कृषी अधिकारी राळेगाव ,कृषी अभियांत्रिकी विभाग यवतमाळ ,श्री.किशोरजी कांबळी ,श्री.कल्पेश वाघमारे कृषी अभियांत्रिकी विभाग राळेगाव ,तसेच राळेगाव येथील ट्रक्टर लाभार्थी श्री. श्रीकांत गांजरे बोरी मेंघापूर ,श्री विकास मांढरे आष्टा ,श्री कैलास रोंघे कोच्ची ,श्री रमेश खंडारे पिंपरी दुर्ग,हि शेतकरी मंडळी उपस्थित होती.