
सहसंपादक : रामभाऊ भोयर
मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे, मनसे नेते राजुभाऊ उंबरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन उपाध्यक्ष आनंद एंबडवार, जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात धानोरा पंचायत समिती गटातील वनोजा येथील ग्रा. पं.सदस्य संजय आत्राम, सुभाष मडावी, मधुकर वाघाडे, आकाश कोटनाके, बापूराव नैताम, राहुल मडावी, सुमित आत्राम, निलेश टेकाम, साहिल वाघाडे, अजय मडावी, नितेश कोटनाके, सागर कचोले, मंगेश वाघमारे, किसना मडावी, योगेश आत्राम, सचिन कोटनाके, गजानन खोडे, गणेश मडावी, दिनेश आत्राम, लक्ष्मण मडावी, अनिकेत कोटनाके, विनोद मडावी, सतीश सोनटक्के, विशाल मडावी, आशिष वाघमारे, पंकज टेकाम यांनी मनसेत प्रवेश करून नवनिर्माणाचा झेंडा हाती घेतला आहे. या पक्ष प्रवेशासाठी धानोरा विभाग अध्यक्ष तुषार वाघमारे यांनी अथक परिश्रम घेतले.
यावेळी वाहतुक ता. सरचिटणीस राहुल भोयर उपस्थीत होते.
