लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक 22/12/2022 रोजी राष्ट्रीय गणित दिवस म्हणजे गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन जयंती साजरी करण्यात आली.त्यावेळी कार्यक्रमात सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विलास निमरड व प्रमुख पाहुणे मोहन बोरकर यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचा स्वागताचा कार्यक्रम पार पडला. सोबतच स्वागत गिताच्या माध्यमातून सर्व मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.त्याचसोबत कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्ग आठवा ब चे वर्गशिक्षक विशाल मस्के यांनी करून गणिताबाबत माहिती दिली.सोबतच आपल्या प्रास्ताविकातून आयुष्य जगण्याची कला शिकविणारा विषय म्हणजे गणित असल्याचे सांगून आपले प्रास्ताविक आटोपते घेतले.यानंतर विद्यार्थी वक्ते पायल पारिसे जान्हवी पारिसे यांनी त्रिकोणाबद्धल माहिती दिली.सोबतच कृतिका चव्हाण सृष्टी चव्हाण गौरी राठोड प्रणिता भोयर हिमानी ठोंबरे हंसिका वैद्य यश भगत यांनी गणित विषयावर आधारित माहिती सांगितली सोबतच श्रीनिवास रामानुजन यांच्या जिवनावर आधारित माहिती सांगितली.सोबतच गणिताचे सुत्राबाबत गीत तयार करुन गायले.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक मोहन बोरकर यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंशिका शिवरकर हिने केले तर आभार सलोनी राठोड हिने मानले.या कार्यक्रमाला विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक रमेश टेंभेंकर,श्रावनसिंग वडते,दिगांबर बातुलवार रंजय चौधरी,राजेश भोयर,मोहन आत्राम, वंदना वाढोणकर, वैशाली सातारकर,शुभम मेश्राम, अश्विनी तिजारे,रिचिता रोहोणकर,वाल्मिक कोल्हे,पवन गिरी, बाबूलाल येसंबरे, विनोद शेलवटे यांचे सह शालेय विद्यार्थी उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्ग शिक्षक विशाल मस्के यांनी अथक परिश्रम घेतले.