
प्रतिनिधी ::प्रवीण जोशी
यवतमाळ
होळीच्या सणाला वृक्षाची कत्तल न करता त्याचे संगोपन करून आगळावेगळा पद्धतीने ढाणकी येथील शिक्षक कॉलनीतील महिलांनी होळी साजरी केली.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले होते. संतांच्या शिकवणीची आठवण ठेवत होळीसाठी कुठल्याही वृक्षाची कत्तल जर वृक्ष लागवड केली तर निसर्गाची संगोपन होईल या कल्पनेने हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी शिक्षक कॉलनीतील समस्त उपस्थित होत्या. या उपक्रमाचे ढाणकी शहरात कौतुक होत आहे.
