
उमरखेड तालुका प्रतिनिधी=-विलास तुळशीराम राठोड (पत्रकार))ग्रामीण
मो. 788755225877
उमरखेड तालुक्यामध्ये राजकीय भूकंप मोहन नाईक यांचा हजारो कार्यकर्त्यांसह पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश
प्रतिनिधी… आज यवतमाळ येथे शासकीय विश्रामगृह येथे माननीय संजय भाऊ राठोड मृदा व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बंदी भागातील ढाण्या वाघ माननीय मोहन नाईक माजी पंचायत समिती सदस्य तथा माजी सरपंच तथा माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तसेच कुरळी येथील श्री. प्रवीण धार्मिक माजी पंचायत समिती सदस्य मोरचंडी येथील उत्तमराव राठोड माजी पंचायत समिती सदस्य भवानी येतील शेषराव राठोड माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कुरळी येथील तुळशीराम जाधव सोसायटी अध्यक्ष निंगनूर येथील गोकुळ उमला राठोड माजी उपसरपंच व उमरखेड तालुक्यातील अनेक वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी अनेक तांड्यातील नाईक कारभारी ग्रामपंचायत सरपंच माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे संचालक व मोहन नाईक वर प्रेम करणारे अनेक कार्यकर्त्यांनी आज मोहन नाईक यांच्यावर विश्वास दाखवून त्यांच्या सोबत सोबत हजारोंच्या संख्येने जाहीर शिवसेनेमध्ये प्रवेश केला आज मोहन नाईक यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे उमरखेड तालुक्यामध्ये राजकीय भूकंप झालेला असून मोहन नाईक यांच्या प्रवेशामुळे उमरखेड तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढली असून काही दिवसा खालीच शिवसेनेमध्ये गोपाल भाऊ राठोड यांच्या वर विश्वास ठेवून पाचशेच्या वर कार्यकर्त्यांनी संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला होता आणि आजच्या या प्रवेश सोहळ्यामुळे बंदी भागातील जनता मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे