
धम्म परिषदेच्या समारोप प्रसंगी बोलतानी मनोगत व्यक्त केले
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर बुद्ध विचार हे मानवाला जगण्याचा आणि माणुसकी वाढविण्याचा संदेश देते सध्याच्या काळात व कायमस्वरूपी जगाला तारण्याचे सामर्थ्य बुद्ध विचारातच आहे म्हणून महापुरुष तेव्हाच जिवंत असतात तेव्हा त्यांचे विचार चालवणारे लोक जिवंत असतात आज तुम्ही जे इथे बसलेले आहे ते बाबासाहेबांचे विचार चालविण्यासाठी बाबासाहेबांना वाचविण्यासाठी बसले आहात असे मनोगत डॉ. ओमप्रकाश फुलमाळी यांनी लोणी येथे धम्म परिषदेच्या समारोह प्रसंगी बोलताना आपले व्यक्त केले.तसेच कार्यक्रमाचा अध्यक्षीय भाषणातून माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी आपले मनोगत व्यक्त केले असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दहा बाय दहाच्या खालीत सोळा सोळा तास अभ्यास करून बाबासाहेब जगाचा हिरो बनला या देशातील प्रत्येक माणसाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला असे सखोल मार्गदर्शन त्यांनी या प्रसंगी आपल्या भाषणातून मनोगत व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमाला उपस्थित अंकुश मुनेश्वर, मुकुंद दारुंडे, रमेश लढे, रणजीत कोरडे, शेखर दारुंडे, राष्ट्रपाल भोंगाडे, प्रशांत भोगटे, बाबुलाल राठोड, रंजन भगत, किशोर धोंगडे, धनराज लाकडे,बंडू उईके,संदीप वारेकर,सुरेश भगत, रवीभाऊ सीडाम, इंदल राठोड, राजू उमरे, वावरे, मुकुंद दारुंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रशांत पाझारे यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वानंद बागेश्वर यांनी केले आहे तर या कार्यक्रमाला गावातील बौद्ध उपासक तथा उपासिका तसेच गावातील इतरही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
