विठ्ठलवाडी भागातील महिलांचे पक्क्या रस्त्यांसाठी आमदारांना निवेदन

वणी शहरातील विठ्ठलवाडी या भागात पक्के रस्ते नसल्याने सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मागील कित्येक वर्षांपासून या भागातील रस्त्यावर पाणी साचून मोठमोठे खड्डे पडून पाणी साचत आहे .विशेषतः पावसाळ्यात या भागात खूप जास्त चिखल होत असल्याने रस्त्यावरुन चालणे कठीण होत आहे.या आधी देखील महिलांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना निवेदन दिले होते.परंतु त्या कडे फारसे काही गांभीर्याने घेतलेले नाही .परंतु या वेळेस या मागणीकडे दुर्लक्ष करू नये अशी विनंती महिलांनी केली आहे.