
वाशिम – परितक्त्या, विधवा व निराधार व्यक्तींसाठी शासनाकडून राबविण्यात येणार्या संजय गांधी निराधार योजनेतील लाभापासून ८ ते १० लाभार्थी सन २०१३ पासून वंचित आहेत. या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात ३० जानेवारी रोजी तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन राबविण्यात आले. व शासनाचा निषेध व्यक्त करुन नायब तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
या योजनेअंतर्गत कल्पना वाघमारे, गिर्जा खडसे यांचे अर्ज गेल्या १३ वर्षापासून प्रलंबित आहेत. तसेच पार्वता झामरे यांचा अर्ज २०२० पासून प्रलंबित आहे. श्रावणबाळ योजनेत वसंतसिह ठाकुर यांचा अर्ज २०१९ पासून, निराधार योजनेतील ज्योती कांबळे, शहेबाजबानो शेख, पुष्पा बोडे, कल्पना वाघमारे यांचे अर्ज २०२० पासून प्रलंबित आहेत. यातील काही लाभार्थ्यांच्या प्रस्तावाच्या फाईली गहाळ झाल्या आहेत. सदर प्रस्तावातील त्रुटी काढून सुध्दा त्यांचे प्रस्ताव मंजुर करण्यात आले नाहीत. योजनेतील वंचित लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी तथा तहसिल कार्यालयाला अनेकवेळा निवेदने देण्यात आली होती. मात्र या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन राबविण्यात आले. या आंदोलनात महिला सेनेच्या शहर संघटक वंदना अक्कर, वाशीम तालुका अध्यक्ष विठ्ठल राठोड, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष रघुनाथ खुपसे, वाशीम शहर उपाध्यक्ष प्रतिक कांबळे, गणेश इंगोले, जनहीतचे तालुका अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, कल्पना वाघमारे, राधा कापडे, मुन्नीबाई बेनीवाले, मालता कांबळे, गिरीजा खडसे, शेवता कांबळे, कविता पवार, चंद्रा चव्हाण, रमेश खरे, वसंता विभुते आदींनी सहभाग घेतला.
