
सहसंपादक : रामभाऊ भोयर
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जण ठार झाल्याची घटना बुधवार दिनांक ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० च्या दरम्यान वडकी राळेगाव रोडवरील टाकळी गावाजवळ घडली
चेतन भीमा बोटूने वय 28 वर्ष व रोहित आत्राम वय 22 वर्ष दोघेही राहणार सावनेर अशी अपघातातील मृतकांची नावे आहेत.
राळेगाव तालुक्यातील सावनेर येथील
चेतन भीमा बोटूने व रोहित आत्राम हे दोघेही जण एमएच-३२- एसी-३६९८) या क्रमांकाच्या मोटरसायकल वाहनाने सावनेर येथून हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथे विटा भट्टीवर कामानिमित्त जात होते.
दरम्यान वडकी राळेगाव रोडवरील सावनेर गावापासून काही अंतरावर असलेल्या टाकळी गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात चेतन भीमा बोटूने व रोहित आत्राम यांचा जागीच मृत्यु झाला. अपघात इतका भीषण होता की मृतक दोन्ही युवकाच्या चेहऱ्यासह शरीर छीन्नविछीन्न झाले होते.
अपघाताची माहिती मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे,पोलीस अंमलदार आकाश कुदुसे चालक,अभिजीत कोष्टवार यांनी लगेच घटनास्थळी धाव घेत घेतली. मात्र ही घटना राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने यावेळी ठाणेदार सुखदेव बोरखडे यांनी लगेच ही माहिती राळेगाव पोलिसांना दिली यावरून राळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळाचा पंचनामा करून अपघातातील मृतकाला
ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे दाखल केले.या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सावनेर गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. रुग्णालयासह घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी उसळली होती.
