गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे नेताजी सुभाष चन्द्र बोस यांची जयंती साजरी


सहसंपादक : रामभाऊ भोयर

गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे नेताजी सुभाष चन्द्र बोस यांची जयंती मोठ्या हर्षोल्लास साजरी करण्यात आली .या कार्यक्रमाचे नियोजन धम्मानंद तागडे यांनी केले होते . कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज कुमार सामृतवार यांनी तुम मुझे खून दो,मै तुम्हे आजादी दूंगा या नेताजीच्या स्फूर्तिदायक घोषणेने केली.त्यांनी आपल्या भाषणातून नेताजींच्या आठवणींना उजाळा दिला,त्यांचा त्याग आजच्या पिढीतील तरुणांनी जरुर अभ्यासला पाहिजे असे मत व्यक्त केले.अजय जी नरडवार यांनी देश कार्यासाठी नेताजींचे बलिदान कधीच विसरता येणार नाही असे सांगितले, त्यांनी आपल्या भाषणातून आझाद हिंद सेनेचा इतिहास कथन केला, सर्व विद्यार्थ्यांनी नेताजींच्या प्रतिमेला मानवंदना दिली.. कार्यक्रमासाठी संदीप सुरपाम सर,की.दुर्गा पेंदोर शिक्षिका, नितीन एंबडवार सर,मंगेश धानोरकर हजर होते, मुख्याध्यापक राजेश शर्मा यांनी सर्वांचे आभार मानले.