
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत दर ५ वर्षांनी पशु गणना केली जाते यंदा २१ वी पशु गणना पार पडली आहे या राळेगाव तालुक्याची वेळेच्या आत मध्ये शंभर टक्के पशु गणना पूर्ण झाली असून त्यांच्या वरिष्ठांकडे अहवाल सादर केला आहे.
ही पशुगणना ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली आहे तालुक्यात नेमलेल्या ११ पशुगणना प्रगनकांनी १३३ गावे (उजाड सह आबाद) तर १७ वार्डात घरोघरी जाऊन पशुगणना पूर्ण केली आहे.
यात पशुपालकांनीही पशुगणनेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे अशी माहिती राळेगाव येथील पशुधन विकास अधिकारी डॉ.सुरेंद्र हाडोळे यांनी दिली आहे.
पशुसंवर्धन विभागाने पशुपालकात जनजागृतीची मोहीम हाती घेतली होती मोबाईल अप्लिकेशन व वेबपोर्टल तयार केले होते यात डिजिटल पद्धतीचा वापर करून पशुधननाची गणना करण्यात आली यामध्ये गाई,म्हशी, शेळी, मेंढी,बैल, कुकुट,घोडा, कुत्रा,आदींची गणना केली आहे ही पूर्णपणे तालुक्यात शंभर टक्के पशुगणना वेळेत पूर्ण केली असून ही गणना करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने ११ प्रगनक नेमले होते त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ३ पर्यवेक्षकांची नेमणूक केली होती.
दर पाच वर्षांनी करतात अधिकारी पशु गणना
राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागात मार्फत दर पाच वर्षांनी पशु गणना केली जाते त्यामुळे राज्यभरात पशुची आकडेवारी समोर येते पशु गणनेसाठी २८ फेब्रुवारी पर्यंत होती मुदत दिली परंतु राज्य शासनाने यात वाढ करून ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ दिली होती परंतु ३१ मार्चपूर्वीच तालुक्यातील प्रगनकांनी पशुपालकांच्या घरी जाऊन गाई म्हशी शेळी मेंढी बैल कुकूट घोडा कुत्रा आदींची पशु गणना पूर्ण केली
पशुपालकांचाही पुढाकार
यंदा २१ वी पशु गणना ही २५ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना होत्या मात्र पासून करायची होती परंतु आचासंहितेमुळे या पशुगणनेला जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली असून यात कर्मचाऱ्यांनी पशुपालकांच्या घरोघरी जाऊन ही गणना केली आहे तालुक्यात वेळेच्या आत शंभर टक्के पशुगणना पूर्ण झाली आहे यासाठी पशुपालकांनी देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत पशुधनाची प्रगनकांना अचूक माहिती दिली.
पशुधन विकास अधिकारी
डॉ सुरेंद्र हाडोळे राळेगाव
