दुर्दैवी घटनेने मेट गावावर शोककळा : रानडुकराच्या कळपामुळे बैलगाडी थेट तलावात , तलावात बुडुन बापलेकाचा मृत्यू

महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव

माळरानावरील शेतात बैलगाडीवरुन जात असतांना बैलगाडी वाघदरा तलावात बुडाली व बैलगाडीतील बापलेकाचा तलावात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता.२१) दुपारी दिड वाजता दरम्यान तालूक्यातील मेट गावच्या शेतशिवारात घडल्याने लहानशा मेट गावावर शोककळा पसरली आहे.

अमोल देविदास चव्हाण (३५ ) व विवेक अमोल चव्हाण (१२) असे मृत्यू झालेल्या बापलेकाचे नाव असून आज सकाळी दोघे बाप लेक स्वतःच्या निंगनुर रस्त्यावरील माळरानावरील शेतात घरून बैलगाडी घेवून निघाले असता प्राप्त माहितीनुसार वाघदरा तलावाजवळ समोरुन रान डुकराचा कळप यांच्या दिशेने धावत येत असल्याने बैलगाडी वाघदरा तलावात घुसवली अन त्यात दोघांचा मृत्यू झाला. घटनेची माहितीची प्राप्त होताच ठाणेदार प्रेम केदार ताफ्यासह घटनास्थळी पोहचले त्यांनी दोन्ही प्रेतांचा घटनास्थळी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविले पुढील तपास ठाणेदार प्रेम केदार यांच्या मार्गदर्शनात रवि गिते, प्रविण जाधव, गजानन खरात, पो, मुंडे करित आहेत.

प्रयत्न ठरले निरर्थ

दरम्यान बैलगाडी ही दोन् बैलासह तलावातील पाण्यात बुडाली. यावेळी बापलेक वाघदरा तलावात बुडतांना त्या आरडाओरड केली मात्र शेजारी पोहचे पर्यंत दोघेही बापलेक तलावात बुडाले होते यावेळी मात्र बैलगाडी ओढणाऱ्या दोन बैल पोहत असल्याने त्यांना वाचविण्यात यश आले. परंतू दोघाही बापलेकाचा तोपर्यंत मृत्यू झाला होता.