
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
राळेगाव यावर्षी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात कमालीचे घट झाली आहे त्यातच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाचे दरही घसरू लागल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमंडले आहेत.
कापसाचा भाव गेल्या महिन्याभरापासून ८००० ते ८५०० च्या दरम्यान स्थिरावलेला आहे .मात्र कापसाला अपेक्षित भाव मिळेल या आशेने शेतकऱ्याने अद्यापही कापूस घरात ठेवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कापसाचा हंगाम आता संपत आलाय मात्र भाव काही वाढण्याचे नाव घेत नाही कापसाला १२ हजार १४ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळणे अपेक्षित आहे मात्र सध्या केवळ ७००० ते ८२०० हजार रुपये एवढा मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला ब्रेक लावला आहे.
गेल्यावर्षी १४ हजार रुपयांवर पोहोचलेला कापसाचा भाव यावर्षी सुरुवातीपासूनच नऊ हजाराच्या उंबरठ्यावर थांबलेला आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादनात कमालीची घट झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे
यावर्षी उत्पादन जास्त होईल या करिता तालुक्यातील शेतकऱ्यांनी खर्चही वाढवावा लागला या संकटावर मात करून शेतकऱ्यांनी पांढरे सोने पिकवले खरे तर मात्र मातीमोल भावाने मागणी होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.