बैल पोळ्याच्या झडत्यांमधून राजकीय फैरी सरकार विरोधी झडत्यांची सोशल मीडियावर धूम…

महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव

पोळा हा सण शेतकरी, कष्टकऱ्यांचा सण म्हणून ओळखला जातो. शेतशिवारात राबणाऱ्या सर्जा राजाच्या जोडीच्या उत्सवाचा हा सण आहे. या सणाला शेतकरी वर्ग पोळ्यात त्यांच्या वेदना मांडणाऱ्या झडत्याही म्हणतो. यावर्षीच्या पोळा सणाला राजकीय झडत्यांची धूम दिसून आली. समाज माध्यमा
वर सत्ता रे सत्ता तिघांची सत्ता…सत्ता रे सत्ता तिघांची सत्ता… बारामतीच्या तरण्या बुढयान आयरी आणलं रे आता… एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव या झडती ने राजकीय व्हॉटसअप ग्रुपवर बरीच चर्चा होती.

बैलपोळा.
आज शेतकऱ्यांचे वैभव असलेल्या बैलांविषयी कृतज्ञतेचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांची पिठोरी अमावस्येच्या दिवशी पूजा करून बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. आदल्या दिवशी बैलांच्या खांदेशेकणीचा कार्यक्रमअसतो. बैलांचे खांदे तूप किंवा दुध तेल हाळद लावून शेकतात खांदा महत्त्वपूर्ण भाग आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पार्वती झडत्याना सुद्धा राजकीय रंग आनला

आज आवर्तन घ्या, अन् उद्या जेवायला या.’ अशा शब्दात घेतला आहे. बैलांना पोळ्यांचे आमंत्रण दिले जाते. यंदा मात्र लंपी संकटामुळे पोळा झडत्यांविनाच जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडेल. पोळ्याचा आनंद शेतकऱ्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्या म्हणण्याची लोकसंस्कृती आजही कायम आहे. पोळ्यात झडत्या आवर्जून म्हटले जातात. पोळ्यात म्हणण्यात येणाऱ्या झडत्या हा लोकसाहित्यातील

एक नमन गौरा हर बोला हर हर महादेव…!!!”

येलाले बेलं, पळसाले या झडतीने मराठा फुलं राज्याच्या सत्तेला हो…

जुतले दोन बैलं! एकाचं नांव ठाणे दुसरा

बारामती… दोघांचे ही कासरे

हो… नागपूरकराच्या हाती…

नागपूरचा धुरकरी पुढं बसला त् धुरजड…

मांग बसला त् सुलार… विविध एकट्या जरांगे नं मोडली हो सरकारच्या बंडीची

आरक्षण आंदोलक जरांगे पाटील यांचा हवाला देण्यात आला असून पोळ्यातील झडत्या काहींना झोमनाच्या असल्या तरी त्यातही आनंद असतो. आनंदी जीवनाकरिता हास्य आवश्यक असूनही विनोदी झडत्याद्वारे बैल पोळ्याला झडत्यांची लोकसंस्कृती आजही कायम आहे. ग्रामीण भागातील शेतकरी या संस्कृतीचे जतन करीत आहे