
ओबीसी समाजाचा विश्वासघात करणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भाजपातर्फे बुधवार दि.15 सप्टेंबर रोजी आसना पुलावर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले व
ओबीसी मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष
व्यंकटेश जिंदम यांच्या नेतृत्वाखाली एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आल्यामुळे दोन्ही बाजूला वाहनाची प्रचंड कोंडी झाली.
रस्ता रोको आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांसमोर बोलताना प्रविण साले यांनी असे सांगितले की, ओबीसीच्या आरक्षणासाठी आघाडी शासनाने जाणून बुजून दुर्लक्ष केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले नाही. त्यामुळे ओबीसीचे आरक्षण पूर्ववत मिळाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही. यावेळी व्यंकटेश जिंदम व जिल्हा सरचिटणीस व्यंकट मोकले यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला. यावेळी एका युवकाने आपल्याला नोकरीचा कॉल आला असल्यामुळे त्वरित जाणे आवश्यक असल्याचे सांगितल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी त्याचे वाहन जाऊ दिले. रस्ता रोको आंदोलनात संघटन
सरचिटणीस विजय गंभीरे, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील धनेगावकर, अरविंद भारतीया, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख ,राम अय्यर,अनिलसिंह हजारी,सुशील चव्हाण,बाळासाहेब देशमुख, मनोज जाधव,मारुती वाघ,प्रभु कपाटे, शततारका पांढरे, संदीप कराळे, आशिष नेरळकर,हरभजन पुजारी, नवल पोकर्णा,आशीष नेरलकर, धिरज स्वामी,
राज यादव,संदीप छप्परवार, बजरंग ठाकुर, श्रीराज चक्रवार, सोनू उपाध्यय,रमेश गठलेवर, धनंजय नलबलवार, सचिन रावका, सुरेश निल्लावार,कुणाल गजभारे, बालू लोंढे, चक्रधर कोकाटे, आनंद पावड़े,
नरेश आलमचंदनानी, राजेश यादव, शीतल भालके, कामाजी सरोदे, महादेवी मठपती,अनुराधा गिराम, वैष्णवी देबड़वार, शततारका पांढरे, शिवरानी हंगरगे,अपर्णा चितळे, निलावती हिवराळे, मेघा स्वामी, कांचन ठाकूर, सत्यप्रभा पांचाळ, वर्षा बंडाळे ,अमोल कपाटे,केदार नांदेड़कर,अम्बादास जोशी,आदित्य जोशी यांच्यासह
भाजपाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
छाया :करणसिंह बैस, ज्ञानेश्वर सुनेगावकर, नरेंद्र गडप्पा, सचिन डोंगळीकर, व्यंकटेश वाकोडीकर
