
पवनार वॉर्ड क्रमांक 2 मधील पंकज सखाराम उमाटे
वय 28 वर्ष रोजच्या प्रमाणे आपल्या दैनंदिन कामावर जाण्याकरिता आपल्या दुचाकीने वरूड इथे कामावर जात असता वरूड रोड जवळील परिसरात काही छोटे मुल पतंग उडवत होते मात्र धागा कमी उंचीवर असून धागा दिसून न आल्याने पंकज यांच्या गळ्याला अडकून गंभीर दुखापत झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास उजेडात आली त्या मुळे काळ आला पण वेळ आली नसल्याने देवच पावल्याचे नागरिक बोलू लागले आहे.
या घटनेत पंकज हा सुदैवाने चांगलाच बचावला पंकज सखाराम उमाटे असे दुखापत झालेल्या तरुणाचे नाव असून
पंकज हा वरूड येथील ॲल्युमिनियम स्लाइडिंग खिडक्या बनविण्याच्या कामा करीता रोजच्या प्रमाणे जात होता रोडचे काम सुरू असल्याने
गाडीचा वेग कमी असल्याचे पंकज याचे कडून सांगण्यात येत आहे
मात्र धागा दिसून आला नसल्याने गळ्यात अचानक काहीतरी अडकल्याचे जाणवले गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता रोड वरील बारीक चुरिवरून गाडी स्लीप झाल्याने खाली पडलो असता मांज्याने गळा चिरून रक्त प्रवाह सुरू झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पंकज याला उपचारार्थ सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले
गळ्याला आठ टाके पडले मात्र थोडक्यात जीव वाचला असून असून मांज्यावर ग्राम पंचायत या कडे लक्ष देवून गावात मांजावर बंदी लादण्या करीता जनजागृती करून ठोस उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे सध्या जिकडे तिकडे पतंगीचे मोठया प्रमाणात तरुणाईला वेड लागले आहे
यात नायलॉन मांजा मोठ्या प्रमाणात विकत घेतल्या जात आहे
याच नायलॉन मांज्यामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागल्याचे सर्वत्र दिसून येत असताना सुधा ग्रामीण भागासह शहरी भागातही दिसून येत आहे
शासनाने या नायलॉन मांज्यावर बंदी आणली असतानाही काही विक्रेते लपून चोरून या मांज्याची विक्री करत आहे यावर कठोर कारवाई करून नायलॉन मांज्या तत्काळ बंद करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
