शिवसेनेच्या(उद्धव साहेब ठाकरे युवा सेना ) मागणीला यश , जळालेल्या ट्रान्सफॉर्मर च्या जागी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरू


प्रतिनिधी प्रवीण जोशी ,ढाणकी


गेली दोन , तीन दिवस झाले जळालेल्या ट्रान्सफॉर्म बद्दल सलग दोन-तीन दिवस विविध वृत्तपत्रात बातम्या प्रसारित होताच महावितरण यांनी खबरदारी घेत जळालेल्या ट्रान्सफॉर्म काढून नव्याने ट्रान्सफॉर्म बसवण्यास सुरुवात केली आहे. करंजी येथील ट्रान्सफार्म गेली चार महिन्यापासून बंद अवस्थेत होता व तसेच ढाणकी येथील बऱ्याच शेतातील ट्रान्सफॉर्म जळालेले आहेत. उद्धव ठाकरे युवा शिवसेना शहराध्यक्ष विजय वैद्य यांनी निवेदनाद्वारे जळालेल्या अवस्थेतील ट्रान्सफॉर्म काढून नव्याने ट्रान्सफॉर्म बसवण्यात यावे अशे निवेदन दिले होते. व याबाबत विविध वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित झाल्या त्यामुळे नवीन ट्रान्सफार्म बसवण्यात सुरुवात झाली त्याबद्दल उद्धव ठाकरे युवा शिवसेना ढाणकी शहरअध्यक्ष विजय वैद्य यांनी वृत्तपत्र, एम.एस.सी.बी कर्मचारी , व युवा शिवसेना यांचे आभार व्यक्त केले.