
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव शहरालगत अवघ्या दोन किलोमिटर अंतरावर अपघाताची शृंखला नेहमी पाहण्यास मिळते काल रात्री 8.00 वाजताच्या सुमारास सावंगी जवळ बैलबंडी व दुचाकी चालकांचा अपघात झाल्याची घटना घडली.
आकाश रमेश रेंघे वय 22 वर्ष, रा झाडगाव हा राळेगाव वरून झाडगाव येथे आपल्या मोटर सायकल क्र MH 29 BL 0157 ने जात असताना आकाश रमेश रेंघे वय 22 वर्ष व सोबत दोघे यांचा सावंगी पेरका गावाजवळ भीषण अपघात झाला.आकाश रमेश रेंघे व गावातील अमर शामराव परचाके वय 25 वर्ष,संकेत संदीप काटकर वय 14 वर्ष हे तिघे राळेगाव येथिल मंडप डेकोरेशन चे कामाला मोटार सायकलने रोज झाडगाव येथुन राळेगाव येथे जाणे येणे करत होते,अशातच काल दि १७ जानेवारी रोजी रात्रि 08/00 वा दरम्यान आकाश रमेश रेंघे, अमर परचाके, संकेंत काटकर हे बजाज प्लाटीना मोटार सायकल ने राळेगाव वरुन झाडगाव येथे जात असतांना सावंगी पेरका गावाजवळ रोडने जाणाऱ्या बैलबंडीला मागुन ठोस मारली यामध्ये अपघातात तिघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे नेले असता यात आकाश रेंघे ह्यांला गंभीर जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाला व संकेत काटकंर,अमर परचाके ह्यांना सुध्दा मार लागल्याने त्यांना पुढील उपचाराकरीता सरकारी रुग्णालय यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे.घटनेची माहिती राळेगाव पोलिसांना मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय चोबे यांचे मार्गदर्शनात पी एस आय मोहन पाटील सह गोपाल वास्टर,पोलीस नाईक सुरज चिव्हाणे हे करीत आहे,
