कु. वैष्णवी रोहिदास राठोड हिचा हेल्प फाऊंडेशनच्या वतीने सत्कार

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड

महागाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रा. पोखरी लहानश्या खेड्यातील कु. वैष्णवी रोहिदास राठोड या विद्यार्थिनीने नीट परीक्षामध्ये भारतातून अव्वल स्थान प्राप्त केले आहे तिने नीट परीक्षामध्ये 720 पैकी 700 गुण घेऊन यश संपादन केले आहे, वैष्णवी ही महागाव तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थीनी तिच्या या यशामुळे महागाव तालुक्याचे नाव राज्यात नव्हे तर देशात उज्वल केले आहे. या बद्दल भाविक भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडच्या वतीने आज दिनांक 25/06/2023रोजी सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष अनुपभाऊ शेखावत, तालुका उपाध्यक्ष शुभम भाऊ राठोड , तालुका सचिव वैभवभाऊ पाईकराव , तालुका सघटक अमोल भाऊ राठोड, तालुका उपाध्यक्ष विद्यार्थी संघटना पियूष हरणे,तालुका अध्यक्ष पवन भाऊ मुडे हे उपस्थितीत होते