जि. प उर्दू शाळेतील विद्यार्थी शेख मावान शेख इरफान महादिप परीक्षेत जिल्ह्यात प्रथम

ढाणकी प्रतीनिधी –
प्रवीण जोशी


ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षेची दारी खुली होऊन प्रशासनाला चांगले अधिकारी मिळावेत या उद्देशाने त्यांचा बालवयापासूनच स्पर्धा परीक्षेचा सराव व्हावा म्हणून जिल्हा परिषदेने गेले वर्षभर महादीप हा उपक्रम शाळांमध्ये राबवला. फेब्रुवारीमध्ये जिल्ह्यातील दोन हजारांवर जिल्हा परिषद शाळांमधील चार लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी केंद्रस्तरीय महादीप परीक्षा दिली. या परीक्षेत ढाणकी येथील जि .प. उ. प्रा. उर्दू शाळा चा विद्यार्थी शेख मावान शेख इरफान वर्ग 7 वा हा जिल्हयात उर्दू माध्यमातून प्रथम आला असून त्याचा सत्कार पालकमंत्री संजय राठोड , जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते जि.प. सभागृहात प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आले.
इतक्या कमी वयामध्ये महादीप परीक्षेमध्ये आपले कौशल्य मावान याने दाखवल्याने ढाणकी शहरात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच इतक्या कमी वयात विमान वारी करणारा मावान हा कदाचित ढाणकीतील पहिलाच बालक ठरणार आहे.
विमान वारी मध्ये दिल्ली, चंदीगढ व शिमला येथील प्रसिद्ध स्थळे दाखविण्यात आले आहे.
जिल्हापरिषद शाळेचे मुख्याध्यपक शिक्षक यांनी मेहनत घेऊन आपल्या शाळेचे नाव चमकविले
मावान यांची कामगिरी पाहून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख फयाज यांनी सत्कार केला