कापूस घरात खाजवतोय अन बाहेर घसरतोय

सहसंपादक -रामभाऊ भोयर

मागील महिन्यापूर्वी बाजारात कापसाचे दर ८००० हजाराच्या पुढे गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या असताना मागील काही दिवसात कापसाच्या दरात कमालीची घसरण झाली असून कापसाचे हे दर ७५०० ते ७८०० रुपयापर्यंत क्विंटल भाव असल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्री पुन्हा थांबविली आहे. कापसाचा भाव आणखी वाढेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
दुसरीकडे कापूस घरात खाजवतोय अन बाहेर दरात घसरतो अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
मागील दोन महिन्यापासून रोज शेतकऱ्यांच्या डोळे बाजारात कापसाच्या दराकडे लागलेले आहेत परंतु बाजार सुधारत नसल्याने गपगुमान राहावे लागत आहे. सुरुवातीला ९००० रुपया पर्यंत गेलेला कापूस वाढण्या ऐवजी घसरत राहिला त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्री तूर्त थांबविली आहे.

मागीलवर्षी कापसाला १४००० हजार रुपये पर्यंत भाव असतांना यावर्षी दहा हजार रुपये तरी भाव राहिला अशी आशा शेतकऱ्यांना होती त्यामुळे आज ना उद्या भाव वाढेल या आशेवर असताना शेतकऱ्यांनी कापूस घरातच भरून ठेवला मात्र फेब्रुवारी महिना संपूनही भाव वाढ झाली नसून आता मार्च एंडिंग नंतर पाहू या भूमिकेत आहेत इतकेच दिवस थांबलो आता आणखी थोडे थांबायला काय हरकत आहे अशी भूमिका घेत शेतकरी सध्या कापूस विकण्याच्या मानसिकतेत नाही.

मागील काही दिवसात वायदे बाजार उघडल्याने दोन तीन दिवसात १०० ते २०० रुपये भाववाढ झाली मात्र शेतकऱ्यांचा कापूस विक्रीला येऊ लागला असता आणखी कापसाच्या दरात घसरण होऊन कापूस ७५०० ते ७८०० रुपये प्रति क्विंटल वर थांबला परंतु कापूस दहा हजार रुपये पर्यंत जाईल अशी अपेक्षा असताना शेतकऱ्यांनी घरातच साठवून ठेवला आहे.मात्र कापसाला जास्त दिवस ठेवल्याने खाजीचे प्रमाण वाढले

चांगल्या दराची प्रतीक्षा करीत असताना भाव वाढीची अपेक्षा भंगली आहे त्यामुळे अजूनही कापूस काही शेतकऱ्यांच्या घरात साठवूनच आहे

फरतड कापसाला बरा भाव
हलका भारी कापूस एकत्रित करून विकण्याचा शेतकऱ्यांना फडतडणे आधार दिला आहे फरतड कापसाला सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळत आहे.