
अर्धापूर – चाभरा येथील खून प्रकरणाचा उलगडा झाला. असून मामा त्याच्या मुलीशी लग्न लावून देत नाही म्हणून भाच्याने मामाचा फोन केल्याचे उघडकीस आले आहे. डोक्यात कुऱ्हाड घालून हा खून करण्यात आला आहे. या खून प्रकरणी आरोपीस मनाठा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
अर्धापीर तालुक्यातील चाभरा येथे दि. 9 शुक्रवार रोजी रात्री घराबाहेर झोपलेले बालाजी दिगंबर काकडे यांचा कुऱ्हाडीने वार करून निर्घून खून करण्यात आला होता. या प्रकरणी मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खून प्रकरणी पोलिसांनी गुप्त खबऱ्यांना कामाला लावून पोलिसांनी या प्रकरणी आरोपीचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली होती. या प्रकरणी कसून तपास करण्यात आल्या नंतर भाच्यानेच खुणाची कबुली दिली आहे.
चाभरा येथील बालाजी काकडे यांच्याकडे भाचा एकनाथ बंडू जाधव यांनी मुलीचा हात मागितला पण तू काम काही काम करत नाहीस असे म्हणत मामाने एकनाथ ला मुलगी देण्यास नकार दिला मामा मुलगी देत नसल्याचे मामा बद्दल राग मनात ठेवून भाच्याने मामाला संपविल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी पोलीस सहाय्यक विजय चव्हाण यांनी तपास करून भाचा एकनाथ बंडू जाधव 19 वर्षे यास अटक केली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर एकनाथ जाधव याने खून केला असल्याची कबुली दिली. या खून प्रकरणी भाचा एकनाथ जाधव यास मनाठा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
