35 हजार लोक संख्या असलेल्या ढाणकीत प्रसाधनगृहाची वानवा

स्वच्छ भारत,सुंदर भारत, स्वच्छ शहर ,सुंदर शहर हे जरी सरकारचे ब्रीदवाक्य असले तरी नगरपंचायत ढाणकीच्या वतीने ते केवळ कागदोपत्रीच राहिलेले दिसून येत आहे. ढाणकी ही बाजार पेठ खूप मोठी असून शहराची लोक संख्या 35 हजारच्या आसपास आहे.व त्यातच चाळीस ते पन्नास खेडे हे गावाला जोडले गेले आहे.या सर्व खेड्यांचे माहेरघर म्हणून ढाणकीस संबोधले तर वावगे ठरणार नाही.या सर्व खेड्यातील लोकांना शहरात बाजार,शालेय साहित्य किंवा शेतीस लागणारे कृषी किंवा ई. साहित्यासाठी गावात यावे लागते.हे जरी सत्य असले तरी एवढ्या मोठ्या तालुका स्तराचे ठिकाण असून सुद्धा गावात कुठेही मूत्री घर नाही.याची कोणत्याच प्रतिनिधीला काही जनाची नाही तर नाही कदाचित मनाची तरी लाज वाटत नाही का?याला ढाणकी कराचे दुर्दैव म्हणावे लागेल . ढाणकी ग्रामपंचायत चे नगर पंचायत मध्ये रुपांतर झाले .नगर पंचायत होऊन तीन वर्षाचा कार्यकाळ निघून गेला तरी सुद्धा गावात मुत्री घर नाही.बाहेर गावून आलेल्या लोकांसाठी व गावातील व्यापारी तसेच वाटसरू साठी लघुशंका आल्यास जावावे तर कुठे?असा प्रश्र्न अनेक जणांना पडतो त्यात पुरुष मंडळी कोण्या तरी काना कोपऱ्यात किंवा दुकांनच्या पाठीमागे जसी जागा मिळेल तसा आपला कार्यक्रम आटोपून घेतात.त्यात कुण्या एखाद्या व्यापारी अथवा घर मालक यांच्या निदर्शनास आले की कोन्ही तर आपल्या भिंतीच्या पाठीमागे लघू शंकेस बसलेले आहे त्यात त्याने आवाज दिल्यास त्याला आपला कार्यक्रम अर्ध्यातच आटोपावा लागतो.

सर्व सुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेली नगरपंचायत मात्र यात कुचकामी ठरत आहे.अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नाच्या बाबतीत नगर पंचायत उदासिन असल्याचे चित्र दिसून येत आहे.