
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कृषी संजीवनी शेतकरी महिला बचत गटाचे अध्यक्षपद २५ वर्षे यशस्वीपणे सांभाळलेल्या श्रीमती विमल ढुमणे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला. गटातर्फे नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच गटाच्या नवीन अध्यक्ष सुद्धा यावेळी निवडण्यात आल्या विमल ढुमणे यांच्या कार्यकाळात गटाने वसंतराव नाईक योजनेअंतर्गत दहा गाईंचे वाटप करून दूध व्यवसायास चालना दिली, तसेच कृषी विभागाच्या सहाय्याने दालमिल व्यवसाय सुरू केला ढूमने यांच्या कार्यकाळात गटाने दैदीप्यमान प्रगती केली प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी स्वतः निवृत्ती घेण्याचे ठरवले यामुळे गटातर्फे त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्याचा आला. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती कुसुम ओंकार यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व साडी चोळी देऊन सत्कार केला.
यावेळी गटाच्या सर्व सदस्यांच्या सहमतीने सर्वानुमते वर्षा ढुमणे यांची नवी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या वेळी सचिव संगीता दोडेवार, सदस्य वर्षा ढुमणे, शुभांगी ढुमणे, सुनिता ढुमणे, कुसुम ओंकार, मंगला कोपरकर, गीता कोपरकर, सुचिता पेंदोर, जयश्री जयस्वाल आणि जया कोपरकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सखी जया कोपरकर यांनी तर आभार प्रदर्शन गौरी ढुमणे यांनी केले
