
प्रतिनिधी,प्रवीण जोशी
ढाणकी येथून जवळच असलेल्या चिंचोली फाट्यानजीक एका वाहनात गायी असल्याची माहिती शहरातील बजरंग दलाच्या शहर संयोजक परमेश्वर निम्मंलवाड यांना मिळाली होती, त्यानुसार त्यांनी आपल्या सोबतिला शहरातील आणखी कार्यकर्त्यांना घेऊन घटनास्थळी गाठून, तिथे संशयित स्थितीत उभ्या असलेल्या वाहनचालक यांना विचारपूस केली, त्याच्या बोलण्यात विसंगती आढळल्याने, बजरंगदलाचा हिसका दाखवताच वाहनचालक पोपटासारखा बोलू लागला, त्याने वाहनातील गोवंश हे कत्तली साठी नेत असल्याची कबुली दिली,त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले व त्याच्या विरोधात लेखी तक्रारी देण्यात आली, तक्रारदार बजरंग दल शहर संयोजक परमेश्वर निम्मंलवाड यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी वाहन व वाहनातील गोवंशांना ताब्यात घेऊन, वाहन चालक व शेख निसारशेख अहमद यांच्यावर विविध कलमानवये गुन्हे दाखल करण्यात आले, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यामुळे गोवंशाची सुटका झाली असल्याने, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे, या मध्ये सहभागी बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रखंड संयोजक देवा देवकते,विकास सुदेवाड, गणेश काकडे, किरण लुटे, किरण सोमेवाड, दिनेश माणिकवाड,कृष्णा जिंकूटवाड,दीपक देवकते, अमोल हाके शिवा तुपेकर, पिंटू हाके रुपेश यांचे मोलाचे सहकार्य लाभले,
