
रक्तदान करणे काळाची गरज: योगेश वाघमारे ठानेदार दराटी यांचे प्रतिपादन
यवतमाळ प्रतिनिधी :-संजय जाधव
उमरखेड तालुक्यातील बंदी भाग म्हणून ओळख असलेल्या दराटी पोलीस स्टेशन येथे आज स्वातंत्र्य दिनाचे ओचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
सध्याच्या परिस्थितीत, रक्तदानाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. अपघात, शस्त्रक्रिया, गरोदरपणातील गुंतागुंत, आणि गंभीर आजारांमध्ये रुग्णांना तातडीने रक्ताची गरज भासते. रक्ताचे अनेक गट असतात आणि प्रत्येक गटातील रक्ताची मागणी वेगळी असते. परंतु, देशातील रक्तपेढ्यांमध्ये अनेकदा रक्ताचा तुटवडा असतो. यामुळे अनेक रुग्णांचे प्राण संकटात येऊ शकतात.
रक्तदान हे एक अत्यंत साधे, सुरक्षित आणि आरोग्यासाठी फायदेशीर कृत्य आहे. रक्तदानाने इतरांचे जीवन वाचवता येते, तसेच स्वतःचे आरोग्यही चांगले राहते. शरीरातील अतिरिक्त रक्त घटक नियमितपणे बदलत असतात, त्यामुळे नियमित रक्तदान हे शरीरासाठी हानिकारक नसते.
सरकार आणि अनेक सामाजिक संघटना रक्तदानाच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेत आहेत. दरवर्षी ११० दशलक्ष युनिट रक्ताची गरज असते, परंतु त्यातील फक्त ७५% गरज भागवली जाते. या पार्श्वभूमीवर, अधिकाधिक लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन दराटी पोलीस स्टेशनचे कर्तृत्व आणि अभ्यासू बुद्धिमान सोज्वळ समाजसेवक अशी ओळख असलेले ठाणेदार योगेश वाघमारे यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दराटी पोलीस स्टेशन अंतर्गत रक्तदान शिबिरांचे कोर्टा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ संदीप दुबे वनविभागाचे वरिष्ठ वन अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दराटी पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिर पार पडला यावेळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला या शिबिरामध्ये दराटी पोलीस स्टेशन येथील सर्व कर्मचारी सरपंच सरपंच पोलीस पाटील व काही होतकरू तरुणांनी रक्तदान करून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा केला
++++++ चोकट ++++++
रक्तदानाच्या मोहिम शिबिरे आणि प्रचार-प्रसाराच्या माध्यमातून नागरिकांना रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. त्यासाठी शाळा, महाविद्यालये, आणि उद्योग समूहांमध्ये विशेष कार्यक्रम राबविले जावेत.
यातूनच आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला रक्तदानाचे महत्त्व पटेल, आणि देशात रक्ताचा तुटवडा कधीही भासणार नाही. रक्तदान हीच मानवतेची खरी सेवा आहे असे म्हणने वावगे ठरणार नाही
डॉ . संदीप दुबे
प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टा
