राळेगांव येथे “मनरेगातून ग्रामसमृध्दी” बुध्दीमंथन कार्यशाळा संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)


विचार विकास सामाजिक संस्था व सरस्वती बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ याचे संयुक्त विद्यमाने पचायत समिती राळेगाव येथे “बुद्धीमंथन कार्यशाळा” आज रोजी पार पडली. मनरेगातुन ग्रामसमृद्धी कशी साधायची या संदर्भात २० ग्रामपचायतचे सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक व रोजगार सेवक याची एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत मनरेगाचे नियोजन, कामाचा आढावा, बजेट, मजुरांचे ताळेबंद याबाबत तसेच मनरेगातून २६२ प्रकारचे काम आपण आपल्या गावात सुरू करू शकतो आणि गाव व शिवाय याचा विकास करू शकतो याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले
या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून बीडचे मा. रविंद्र इगोले (प्रशिक्षक यशदा पूणे) अध्यक्ष म्हणून मा. प्रशांत तायडे सभापती पं. स.,राळेगाव प्रमुख पाहुणे म्हणुन रविकात पवार पं स गटविकास अधिकारी राळेगाव बाळासाहेब बेहरे अभियता मनरेगा हे लाभले
बुध्दीमथन कार्यशाळेचे संचलन प्रमोद काबळे, प्रास्ताविक गंगाधर घोटेकार तर आभार प्रदर्शन हरीष भगत यांनी केले. कार्यशाळेचे यशस्वीतेकरीता सी. झेड. व्यापारी, किशोर चौधरी, नानाजी सिडाम, ममता वेलगधवार, कल्पना मोरे, प्रदिप कोरडे, जयानंद टेभेकर, गणेश बरडे, स्वप्नील घोटेकार, महेंद्र धुर्वे यांनी विशेष परिश्रम घेतले