
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

गरीब घरात जन्माला येऊन ग्रामीण अडीअडीचणीत वाढलेल्या मुलाना शहरात जाण्याची संधी मिळाली अन् तेथील नवलाई पाहून निरागस मुले आनंदीत झाली,ही संधी धानोरा केंद्राने आयोजित केलेल्या सहलीमुळे मिळाली.धानोरा केंद्राअंतर्गत येणाऱ्या येवती, चहांद, परसोडा, मुधापूर,वाठोडा,रानवड,उंदरी व सोनामाता हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने सत्र 2022-23 ची शैक्षणिक सहल दिनांक 13 जानेवारी ला नुकतीच पार पडली.कोरानाच्या काळात शैक्षणिक उपक्रमाना खीळ बसली होती.त्यातून विद्यार्थांना परत उत्साह मिळवून देण्यासाठी केंद्राच्या वतीने नागपूर दर्शन ही शैक्षणिक सहल केंद्राचे केंद्रप्रमुख विजय दुर्गे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व या शैक्षणिक सहलीचे प्रमुख बाबा घोडे सर यांच्या आयोजनाखाली या शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते हे विशेष.
सर्वप्रथम मेट्रोने सफर करून विद्यार्थ्यानी संपूर्ण नागपूर शहरांचा आनंद लूटला.त्यानंतर विज्ञानाचा खजिना असलेल्या रमण विज्ञान केंद्राला भेट देऊन तारांगण,थ्री डी शो व विज्ञान प्रयोग यांचा प्रत्यक्ष योग विद्यार्थांना जुळवून आणला.त्यानंतर नागपूर येथील प्राणिसंग्रहालय समजल्या जाणाऱ्या महाराज बाग ला भेट देऊन येथील प्राण्यांची माहिती विद्यार्थांना झाली.त्यानंतर दीक्षाभूमी येथे भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची व जीवनाची माहिती झाली.विद्यार्थी आकाशात घिरट्या घालणाऱ्या विमानाकडे कुतूहलाने बघायचे.परंतु या सहलीमुळे नागपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर जाऊन त्यांनी प्रत्यक्ष विमानाचे उड्डाण बघितले.
ही शैक्षणिक सहल यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख विजय दुर्गे, सहलप्रमुख बाबा घोडे , केंद्रातील शिक्षकवृद येवती शाळेचे कुणाल सरोदे,रविंद्र चालखुरे,राजेंद्र खुडसंगे,रुपाली बोदांडे परसोडा शाळेचे भास्कर खंडाळकर,वाठोडा शाळेचे दिपक मलमे,संदीप टुले,रानवड शाळेचे प्रवीण तीतरे,मुधापूर शाळेचे सुभाष पारधी,चहांद शाळेचे तुकाराम हाते,उंदरी शाळेचे खेमचंद चिमणे, सोनामाता हायस्कुलचे मुख्याध्यापक अनिल धोबे,शिक्षकवृंद अतुल दांडेकर,सतिश सावंत,राजेंद्र कांबळे, प्रथमेश राऊत यांचे योगदान लाभले.
