गाडगे महाराज विद्यालय अंतरगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे दिनांक 03/01/2025 रोजी सावित्रीबाई फुले जयंती थाटात साजरी झाली.सावित्रीच्या वेषात प्रणाली वनारसे, आर्या धनवीज, पुर्वी वगारहांडे व सृष्टी दुधकोहळे यांनी सावित्रीबाई चा इतिहास कथन केला,इतर विद्यार्थ्यांची सुध्दा भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कु.दुर्गा पेंदोर, प्रमुख पाहुणे एम.पी.सामृतवार ,अजय नरडवार व्यासपीठावर उपस्थित होते.सर्वांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे दिली… कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षरा हरडे व आभारप्रदर्शन आचल भटकर हिने केले.