भाविक भगत फौंडेशनच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना मिळाली नुकसानभरपाई, महावितरण च्या हलगर्जीपणा मुळे शेतकऱ्यांचे नुकसान

आमरण उपोषणाच्या पद्धतीने भाविक भगत यांनी सोडवले शेतकऱ्याचे प्रश्न…!

लोकहीत महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी: संदीप जाधव

महागाव येथे तहसील कार्यालयासमोर श्री गोविंदराव देशमुख व विनोद भगत यांच्या शेतातील दोन एकर ऊस महावितरणच्या हलगर्जी पणामुळे जळुन खाक झाला.महावितरण,कृषी विभाग, तलाठी, पोलीस स्टेशन सर्व पंचनामे झाले असता यवतमाळ येथील विद्युत निरिक्षक यांनी सुद्धा पंचनामा केला, व पुसद येथील कार्यकारी अभियंता यांन आम्हा दोघांना नुकसान भरपाई देण्यासाठी पत्र दिले . दिनांक 05/05/2022पासून आज पर्यंत आम्हाला नुकसान भरपाई पोटी जी रक्कम देण्यात यायला पाहिजे होती ती मिळाली नसल्याने शेतकरी हरीत क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंती निमित्ताने व कृषी दिनाचे औचित्य साधुन शेतकऱ्यांना आमरण उपोषणाला बसावे लागले. तिनशे ते चारशे लोकांनी उपोषणाला पाठिंबा दिला. भाविक भगत व त्यांची संपूर्ण टीम सकाळ पासुन आमच्या समस्या कशा सोडवता येतील यासाठी भरपुर प्रयत्न केले . भाविक भगत हेल्प फौंडेशनचा पाठिंबा दिला व सायंकाळपर्यंत त्यांना पूर्ण रूप मिळाला.भाविक भगत, जगदिशजी नरवाडे जिल्हाध्यक्ष अनुप शेखावत जिल्हा उपाध्यक्ष विष्णू चौधरी जिल्हा उपाध्यक्ष विद्यार्थी संघटना निकेश राठोड महागाव तालुका अध्यक्ष शुभम वानखेडे तालुका उपाध्यक्ष शुभम राठोड तालुका सचिव वैभव पाईकराव तालुका सरचिटणीस अमोल राठोड तालुका अध्यक्ष अंपग संघटना प्रेमानंद पांचाळ तालुका उपाध्यक्ष पियुष हरणे सोशल मीडिया प्रमुख पवन मुडे तालुका संघटक रूपेश मोरे तालुका समन्वयक विनोद भोयर तालुका सह सचिव मनिष पांडे विनायक सोनाळे, विकास राठोड, सौरभ तगडपल्लेवार, सत्यजित भोयर,उप अभियंता पुसद आडे साहेब, कार्यकारी अभियंता यवतमाळ एई व भाविक भगत यांनी उपोषण विषयी डि.वाय.एसपी साहेब यांच्याशी चर्चा करुन तसेच .चव्हाण साहेब उप अभियंता महागाव यांना लेखी आश्वासन देऊन उपोषण सोडवण्यासाठी भाग पाडले. उपोषण कर्त्याला सरबत पाजुन उपोषणाची सांगता करण्यात आली.