
ढानकी प्रतिनिधी ::प्रवीण जोशी
ढाणकी
ढाणकी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीलगत सिमेंट बंधारा मंजूर झाल्यामुळे आट्रीच्या नाल्याचे वाहणारे पाणी अडवून सिंचन साठा झाल्यास भविष्यात पाणीपुरवठा विहिरीची पाणी पातळी वाढणार असून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या ढानकीकरांना दिलासा मिळणार आहे.
ढाणकी ते मेट रस्त्यावर अट्रीच्या नाल्यावर सिमेंट बंधाऱ्याचे भूमिपूजन नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल यांच्या हस्ते पार पडले . यावेळी सहकार क्षेत्राचे अध्यक्ष बळवंतराव नाईक, संघचालक आनंदराव चंद्रे, विष्णुदासजी वर्मा, भाजपा तालुका अध्यक्ष सुदर्शन रावते, गणेश सुदेवाड, नागेश रातोळे, प्रकाश जयस्वाल, दत्ता सुरोशे, श्रीकांत देशमुख, भारत तुपेकर, हराळे, मारोतराव रावते, बबनराव रावते, नगरपंचायतचे लिपिक राजू दवणे, सिद्धू गायकवाड, प्रमोद गायकवाड, विशाल खोपे, इत्यादी नगरपंचायत चे कर्मचारी उपस्थित होते.
ढाणकी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीलगत 32 मीटर 200 लांबीचा सिमेंट बंधारा मंजूर झाला. त्या बंधाऱ्याचे बांधकाम सुरू करण्यासाठी भूमिपूजन सोहळा आज पाच एप्रिल रोजी पार पडला. या सिमेंट बंधाऱ्याच्या बांधकामासाठी 80 लक्ष रुपये नीधी प्राप्त झाला आहे. सदर काम हे रुद्रायणी कंट्रक्शन या कंपनीला मिळाले असून दोन मीटर 115 या बंधाऱ्याची रुंदी असून दोन मीटर 100 उंची असणार आहे.आट्रीच्या नाल्यावर बांधलेल्या पुलांची उंची साधारणता 7.100 असल्यामुळे नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याची विसर्ग सुव्यस्थित होणार आहे. नाल्याच्या दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यांच्या शेतात पावसाळ्यात पुराचे पाणी शिरनार नाही म्हणून पाच मीटर उंच पूर संरक्षण भिंत उभारण्यात येणार आहे. या सिमेंट बंधाऱ्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी कमी अधिक प्रमाणात साठवणुकीच्या हिशोबाने बंधार्यावर तीन चॅनेल गेट फिरकी बसवण्याची व्यवस्था या प्रकलनात समाविष्ट करण्यात आल्यामुळे जलसाठ्यात वाढ होऊन पाणीपुरवठा करणाच्या विहिरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन ढाणकी ची पाण्याची समस्या कायमची दूर होणार आहे.
