
लता फाळके / हदगाव
निवघा (बा) येथील गावालगत व मंदिरा शेजारी असलेली पोल्ट्रीफार्म न हटविल्यास निवघा ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा इशारा हदगांव तहसिल, पंचायत समिती हदगांव, पोलिस स्टेशन हदगांव, आमदार माधवराव पाटील,व निवघा ग्रामपंचायत याना निवेदन देऊन केला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून येथील एका युवकाने भर उच्चभ्रू वस्तीत पोल्ट्रीफार्म सुरु केले असून ग्रामपंचायत ची परवाणगी न घेता व्यवसाय सुरु केल्याने याचा नाहक त्रास येथील शेजाऱ्याना होत आहे. तर येथे लागूनच हनुमान मंदिर आहे, तर बाजुलाच वैदू समाजाचे मंदिर असल्याने हिंदू धर्मांच्या भावना दुखावत आहे. तर परीसरात दुर्गंधी पसरली असून, बर्डफ्ल्यु या रोगाचा फैलाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पोल्ट्री फॉर्म मुळे रस्त्यावर मोकाट कुत्र्याचा सुळसुळाट झाला असून चाळीस ते पन्नास कुत्रे रस्त्यावर बसूनच राहतात यामुळे अनेक छोटे मोठे अपघात घडले आहेत. याबाबत सदरील युवकास दुकाण बाजुला नेण्यास विनंती केली असता तो अरेरावीची भाषा बोलत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तर या पुर्वी निवघा ग्रामपंचायला ता.१८/१२/२०२० ला एक व १७/२/२०२१ व २३/३/२०२१ असे तिन वेळेस निवेदन देऊन काहीही कार्यवाही झाली नसल्याने ग्रामस्थानी ता.१८ ऑगस्ट पर्यंत दुकाण न हलविल्यास ता.१९ ऑगस्ट पासून उपोषणाला बसण्याचा इशारा हदगांव येथील तहसिलदार, पंचायत समिती, पोलिस स्टेशन व निवघा ग्रामपंचायतला दिला आहे. निवेदनावर विनायकराव कदम, भगवानराव शिंदे, सुभाष कदम, जामगडे इत्यादी सह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत…
