
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला ज्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले त्यांनतर मंत्री नेत्यांनी तालुक्याला भेटी दिल्या, मदतीच्या घोषणाही झाल्या पण प्रत्यक्षात मात्र मदत मिळाली नव्हती मदतीसाठी तारीख पे तारीख सुरु होती पण शासनाने अखेर मदतीची रक्कम
तहसीलदाराच्या खात्यात वळती केली पण मदतीच्या लाभार्थी शेतकऱ्याच्या याद्या बनवनार कोन यासाठी महसूल व कृषी कर्मचाऱ्यांमध्ये वाद सुरु असल्याने शेतकऱ्यांना मिळणारी मदतीची रक्कम लटकली आहे .जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील नदी नाले ओसंडून वाहले ज्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पावसाने शहराला लागून असलेल्या बहुतांश नदी नाल्याला पूर आल् अनेक ठिकाणी शेत खरडून गेली होती तसेच नाल्याकाठच्या व इतरही बहुतांश शेतातील पीक पाण्याखाली होते ज्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतातील पीक हे लहान असल्याने व त्यात पाणी साचून राहल्याने ते पीक सुद्धा मेले होते पावसाने शेतकऱ्यांचे बांध ,धुरे फोडून टाकले ज्यामुळे शेत जलमय झाली नाल्याकठचे शेत मोठ्या प्रमाणात खरडून गेली काही शेतात तर केवळ दगड शिल्लक राहिली त्यानंतही अनेकवेळा अतिवृष्टीने शेताचे इतके नुकसान झाले की अलीकडील चार पाच वर्षात ते भरून निघणार नाहीत.मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने स्वाभाविक शेतकऱ्यांचे डोळे शासकीय मदतीकडे लागले होते प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे केले आमदार ,राज्याचे विरोधी पक्ष नेते,कृषिमंत्री यांनी नुकसानीची पाहणी केली पाहणी करून गेल्यानंतर तात्काळ मदतीचे आश्वासन सर्वांनी दिले पण आजतागायत शेतकऱ्यांना मदत मात्र मिळाली नव्हती पण आता नुकसानभरपाईची रक्कम तालुक्याला मिळाली आहे नुकसानभरपाईचे 52 कोटी रुपये तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहे पण मदत कोणाला किती द्यायची अश्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्याच अजून तयार नसल्याने मदत वाटपाचा प्रश्न तहसीलदारसमोर उभा आहे याद्या बनवायचे काम आमचे नाही ते कृषी विभागाचे काम आहे तसेच त्या कामाचा कुठलाही मेहनताना तलाठ्याला दिला जात नाही तसेच याबाबत तलाठ्यावर कार्यवाहिही करण्यात येते त्यामुळे अनुदान वाटपाचे काम तलाठी करणार नाही असे त्यांच्या संघटनेने शासनाला कळविले आहे दुसरीकडे कृषी विभाग तालाठ्यासोबत काम करावयास तयार आहे जमिनीची नेमकी माहिती ही तलाठ्याकडे असते त्यामुळे त्यांनी पुढाकार घेतल्यास कृषी सहायक लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या बनवण्यास तयार आहे असे समजते महसूल व कृषी विभागात याद्या कोण बनवणार यावरती एकमत होत नसल्याने अजूनपर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांची यादीच बनली नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणानुसार तालुक्यातील 31214 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला त्यांना 52 कोटी 22 लाख रुपयांची मदत शासनाच्या नव्या निकषानुसार मिळली आहे व ती तहसील कार्यालयाला प्राप्त ही झाली आहे आता ती कधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे सध्यस्तीतीत सणासुदीचे दिवस आहेत दसरा तोंडावर आहे तर दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहेत अश्यावेळी शेतकऱ्यांना पैशाची अधिक गरज असते यावेळची पिकपरिस्तिती पाहता दिवाळी पर्यंत केवळ बोटावर मोजता येणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी अगदी थोडा कापूस येईल त्यामुळे सोयाबीन तर अजून हिरवेच आहे बहुतांश शेतकऱ्याकडे दिवाळीपर्यंत कापूस व सोयाबीनही येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी पक्की अंधारात जाईल असे चिन्ह असताना अश्यापरिस्थितित नुकसानभरपाई ची रक्कम शासनाकडे आली असल्याने पण शासनाच्या केवळ दोन विभागाच्या भांडणात जर ती शेतकऱ्यांना मिळण्यास विलंब होत असेल तर या बाबीकडे निश्चितच खाल पासून वरपर्यंत विचार होण्याची गरज आहे आता दसऱ्यापर्यंत रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणे दुरापास्त आहे पण दिवाळीच्या अधितरी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी अशी माफक अपेक्षा शेतकरी करीत आहे यात शासन प्रशासनाने त्वरित दखल देत हा प्रश्न मार्गी लावावव्यास हवा व शेतकऱ्यांच्या खात्यात लगेच रक्कम जमा करावयास हवी तेव्हाच शेतकऱ्यांची दिवाळी उजेडात जाईल.
