ढाणकी शहरातील श्री अमृतेश्वर जेष्ठ नागरिक मंडळाचा स्तुत्य उपक्रम पक्षासाठी कृत्रिम पानवटे तयार करण्याचा उपक्रम घेतला हाती


प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
यवतमाळ

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षक कॉलनी आदरणीय बाळासाहेब ठाकरे चौक परिसर ढाणकी येथे पक्षाकरिता झाडावर प्लास्टिकच्या टोपल्या बांधून अनेक मुक्या व अबोल अशा छोट्या छोट्या लहान पक्षांना पाणी पिण्याची कृत्रिम पानओट्याची व्यवस्था करण्यात आली हा उपक्रम दिनांक १९ एप्रिल ला बुधवार रोजी अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने सकाळी आठ वाजता राबविण्यात आला यावेळी श्री अमृतेश्वर जेष्ठ नागरिक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते

सध्या प्रचंड ऊन तापत असताना माणूस आपली पाणी पिण्याची व्यवस्था कुठेही करून आपली तहान भागवू शकतो पण लहान फुलपाखरे चिमण्या व इतर सर्वच लहान मोठी सजीव यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी बेहाल होत असताना आपण बघितले आहे. पण अशा स्तुत्य उपक्रमाची नितांत गरज होती आणि तोच उपक्रम दिनांक १६ तारखेला श्री अमृतेश्वर जेष्ठ नागरिक मंडळाच्या सभेत ठरल्याप्रमाणे एक अत्यावश्यक उपक्रम हाती घेऊन तो दिनांक आज रोजी १९ एप्रिल ला पार पडला नक्कीच येणाऱ्या काळात तरुणांना व युवकांना व बालकांना सुद्धा या उपक्रमामुळे अबोल आणि मुक्या पक्षाविषयी एक भूतदया निर्माण होईल व माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितलेले ब्रीदवाक्य “भूता परस्परे जडो मैत्री जीवांचे” हे त्यांचे वचन ध्यानात राहील व येणाऱ्या काळात हा उपक्रम अधिक व्यापक व मोठ्या प्रमाणात होईल एवढे नक्की कुठेतरी दुपारच्या वेळी चिमण्यांचा चिवचीवाट दूर झाला आजी नातवाला खेळवत असताना चिमण्याला अंगणात तांदूळ टाकल्यानंतर हजारो चिमण्यांचा थवा येत होता पण तो आता मानवाच्या भौतिक सुखामुळे पडद्याआड गेला मानवाने निसर्गाच्या चक्रामध्ये नेहमीच ढवळाढवळ केली निसर्गाने मानवाला भरभरून दिले आणि मानव मात्र निसर्गाकडून घेतच राहिला पण अशा या उपक्रमामुळे ती गेलेली आठवणीतील सोनेरी क्षण पुन्हा येण्यासाठी हे एक पाऊल पुढचं असेल