यशनी नागराजन सहायक जिल्हा अधिकारी यांची पळसकुंड, उमरविहीर गावाला भेट

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर


मा.यशनी नागराजन (I.A.S) सहाय्यक जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी गट ग्रामपंचायत पळसकुंड/ उमरविहीर अंतर्गत येणाऱ्या पारधी बेडयाना भेट दिली व विकास कामे मंजूर करण्याचे आश्वासन दिले त्यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी मा. सोनार सर , मा. गीरी सर, व मा. गेडाम सर , हे उपस्थित होते व मा.सरपंच श्री.वनिष नि.घोसले मा.उपसरंच श्री.सुभाष वि.शिंदे, ग्रामपंचायत सदस्य श्री.नानाजी वि.सीडाम व संपूर्ण ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी व गावकरी उपस्थीत होते तसेच पळसकुंड ग्राम पंचायत मा.सरपंच श्री. वनिष नि.घोसले यांनी गावा बद्दल व समाजा बद्दल सविस्तर माहिती समजून सांगितली व गाव पाहणी झाल्या नंतर स्वागत समारंभाचा कार्यक्रम पळस कुंड उमर विहीर येथे घेण्यात आला व त्यावेळेस मा. सरपंच यांनी विनामुल्य आधीवाशी बांधवाना जातीचे प्रमाण पत्र व अपंगांना साहित्य मा. सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वितरण केले व तसेच आपल्या प्रस्तावित भाषणात पारधी समाज व इतर आदिवासी समाजाचा विकास करायचा असेल तर शैक्षणिक दृष्ट्या व सामाजिक दृष्ट्या समाज स्वावलंबी व्हावे असे मा.सरपंच श्री.वनिष नि घोसले यांनी संबोधित केले व यावेळी कार्यक्रमाअंती सुचविलेल्या संपूर्ण कामाला प्राथमिकता देऊन मंजूर करण्याचे आश्वासन दिले. सदर या कार्यक्रमाचे संचालन सरपंच वनिष घोसले यांनी केले तर
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माजी सरपंच श्री.नानाजी सिडाम यांनी केले.