ढाणकी नगरपंचायत चे काँग्रेस पक्षाच्या गट नेत्याचे सदस्यत्व रद्द विना परवाना बांधकाम करणे भोवले,जिल्हाधिकारी चे आदेश धडकताच राजकीय चर्चेला उधाण


प्रतिनिधी::प्रवीण जोशी


यवतमाळ ::तालुक्यातील मोठी बाजार पेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकारणात प्रचंड मोठा ठसा असणाऱ्या ढानकी नगरपंचायत मध्ये दिनाक ०८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय यवमाळ यांचे आदेश धडकताच सर्वत्र राजकीय नेते मंडळी, पुढारी यांच्यात चर्चेला उधाण आले आहे.
नगरपंचायत ढानकी मध्ये २०१९-२०मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत जनतेतून निवडून आलेले भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल यांना नगरपंचायत मध्ये अध्यक्ष पदाचा मान मिळाला पण स्वतःचे सरकार स्थापन करण्यात त्यांना यश प्राप्त झाले नाही त्यामुळे काँग्रेस पक्ष व त्यांचे सहयोगी पक्ष एकत्रित सता स्थापन करण्यात आली त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष तर काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष झालेत पण यांच्यात राजकीय षडयंत्र प्रत्येक कामात राजकारण यामुळे ढानकी च्या विकासाला खीळ बसली आहे असे सर्व सामान्य जनतेतून बोलल्या जात आहे.
नगरपंचायत ढणकी येथील नगराध्यक्ष सुरेश नारायण जयस्वाल यांनी दिनाक २५ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र नगर परिषदा,नगर पंचायत आणि औद्योगिक वसाहत अधिनियम १९६५ चे कलम ४४ (ई) अंतर्गत नगरपंचायत ढाणकी येथील उपाध्यक्ष शेख जहीर अहमद शेख मोला यांचे विरुद्ध न . प.सभासदत्व रद्द करण्याकरिता अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथ दाखल करण्यात आले होते.
सदर तक्रारीवरून शेख जहीर अहमद शेख मौला हे ढाणकी नगरपंचायत चे उपाध्यक्ष असून ते नगरपंचायत अंतर्गत काँग्रेस गटाचे गट नेता सुद्धा आहे त्यामुळे त्यांचा मुलगा शेख अकीफ जावेद शेख जहीर अहेमद रा. ढाणकी यांच्या मालकीची प्रभाग क्रमांक ०६ मधील मालमत्ता क्रमांक २१७१ ही जागा २७/१०/२०२१ रोजी खरेदी खता प्रमाणे खरेदी केली आहे. त्यानंतर सदर मालमतेचा फेरफार होण्यासाठी अर्ज मुख्याधिकारी न.प. यांचेकडे सादर केला त्या आधारे जाहीर नोटीस प्रसिद्ध केल्यानंतर ती मालमत्ता अर्जदाराच्या नावे नमूद करण्यात आली आणि त्यावर कर आकारणी सुद्धा करण्यात आली तद्नंतर त्यावर त्यांनी सण २०२२-२०२३ मध्ये बांधकाम केल असून सदर बांधकाम करतांना त्यांनी न.प. ढाणकी येथील बांधकाम परवाना घेणे बंधनकारक असताना कुठलाही बांधकाम परवाना घेतला नाही तसेच तक्रारदार यांनी कर आकारणी यादी(२०१५-१६), नागरिकांच्या तक्रारी अर्ज, इमारतीचे छायाचित्र, माहिती अधिकार अंतर्गत मिळालेली माहिती कागदपत्रे सादर करीत तक्रारदार यांनी शेख जहीर अहमद शेख मोला यांनी त्यांचा मूलगा शेख अकीफ जावेद शेख जहीर अहेमद यास अवैध बांधकामाला पूर्ण सहकार्य केलेले असल्यामूळे व त्या बांधकामामध्ये उपाध्यक्ष न.प. यांचा प्रत्यक्ष सहभाग येत असल्यामूळे त्यांना अपात्रता अर्जीत केलेली आहे त्यामूळे त्यांचे सभासदत्व रद्द करण्यात यावे आणि अवैध बांधकाम पाडून टाकण्याबाबत सुचित करावे अशा स्वरूपात तक्रार अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या कडे करण्यात आला. त्यावर जिल्हाधिकारी यांना योग्य चौकशी अहवाल मुख्याधिकारी नगरपंचायत महागाव यांनी ०५/०१/२०२३ रोजी तसेच मुख्याधिकारी नगरपंचायत ढाणकी यांनी १०/०७/२०२३ रोजी चे अहवाल सादर केले. सदर अहवालाची तसेच तक्रारदार व गैरअर्जदार यानी दिलेल्या जबानी व अधिवक्ता यांच्या युक्तीवाद ऐकल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम१९६५ चे कलम ४४(१)( ई) मध्ये नमूद केल्या प्रमाणे पालिका सदस्यांनी स्वतः किंवा त्यांचेवर अवलंबून असलेल्या व्यक्तीने या अधिनियमाचा किवा महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियमाच्या किंवा तरतुदीचा भंग किवा अनाधिकृत संरचनात्मक बांधकाम केलेले असेल किवा अनाधिकृत बांधकाम करण्यास असा पालिका सदस्य या नात्याने प्रत्यक्षपणे किवा अप्रत्येक्षपणे जबाबदार असेल किंवा या नात्याने त्याने त्याकामी मदत केलेली असेल किंवा कोणतेही बेकायदेशीर किवा अनाधिकृत बांधकाम पाडून टाकल्याचे आपले पदावरील कर्तव्य पार पाडणाऱ्या कोणत्याही सक्षम प्राधिकार्‍याच्या कामात लेखी प्रत देऊन किंवा प्रत्यक्ष जागेवर जाऊन अडथळा आणला असेल किवा अनाण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यास त्याच्या पदावधीतील कोणत्याही वेळी पालिका सदस्य म्हणून पद धारण करण्यास अनर्ह ठरविण्यात येईल आणि पोट कलम(३) च्या तरतुदींच्या अधीन सदस्य म्हणून चालू राहण्यास निःसमर्थ ठरविण्यात येईल व त्यांचे पद रिकामे होईल अशी तरतुद आहे. त्याअनुषंगाने सदर इमारतीचे बांधकाम२०२२-२०२३ या वर्षामध्ये पूर्ण झाल्याचे मुख्याधिकारी यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे रेकार्डवर उपलब्ध फोटोवरून सदर इमारत दोन मजली आरसीसी बांधकाम केलेली असुन शेख जहीर अहेमद शेख मौला यांच्या नगर पंचायत ढाणकी च्या सदस्य पदाच्या तसेच उपाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात केलेली आहे व सदर बांधकामास नगर पंचायतची परवानगी घेतली नाही ही बाब सिद्ध होते तसेच शेख अकीफ जावेद शेख जहीर अहेमद यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांचे वय२७ वर्ष नमुद असून त्यांनी हे नवीन बांधकाम केलेल्या इमारती मध्ये वेगळे राहत असल्याचे दर्शविण्यात आले असले तरीही त्यांनी सदर बांधकाम स्वतःच्या आर्थिक उत्पन्नातून केल्याबाबत व आर्थिक उत्पनाबाबत कुठलाही कायदेशीर पुरावा आयकर पत्र दाखल करण्यात आले नाही . त्यामूळे शेख जहीर अहेमद शेख मौला सदस्य नगर पंचायत ढाणकी यांना याव्दारे महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ४४ (१) ( ई) मधील तरतुदीनुसार नगर पंचायत ढाणकीचे सदस्य म्हणून राहण्यास दिनाक ०८/११/२०२३ पासून नगर पंचायतीच्या पूढील कालावधी पर्यंत अपात्र करण्यात आले असून त्यांनी धारण केलेले सदस्य पद रिक्त करण्यात आले आहे.

राजकीय षडयंत्र असुन याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार


अर्जदार हा भारतीय जनता पक्ष्याच्या वतीने निवडून आलेला पदाधिकारी असून राजकीय प्रतिस्पर्धी असून राजकीय द्वेषबुधीतून व आकसापोटी राजकीय दबावतंत्राचावापर करून सत्ताधारी पक्षाच्या हुकूमशाही नेतृत्वातून घडविलेले राजकीय षडयंत्र आहे, माझे न्यायपालीकेवर पूर्ण विश्वास असून या आदेशाविरुद्ध मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.


शेख जहीर अहमद शेख मौला