पाचोरा येथील पत्रकारावर आमदार च्या कार्यकर्त्यांनी केली मारहाण व शिवीगाळ,व्हॉइस ऑफ मीडिया च्या वतीने तहसीलदारांना निवेदन

.
लोकहित महाराष्ट्र उमरखेड तालुका प्रतिनिधी: संदीप बी जाधव


जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण व शिवीगाळ केली पत्रकारावर केलेल्या हल्ल्यांचे कदापि समर्पण करता येणार नाही. पत्रकार महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्यांचे व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणी गंभीर दखल घेऊन आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच दोषींना कडक शासनाकडून कार्यवाही करण्यात यावी व संदीप महाजन यांना न्याय मिळवून द्यावे लोकप्रतिनिधी संयम बाळगून आपले कर्तव्य बजावणी अपेक्षित आहे लोकप्रतिनिधी शिवीगाळ किंवा अपमान जनक व्यक्तव्य पत्रकारांशी करू नये. अशी समज आमदार किशोर पाटील यांना आपल्या स्तरावरून देण्यात यावी.
आज व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने उमरखेड येथील तहसीलदार देऊळगावकर साहेब यांना पत्रकार संघाकडून निवेदन देण्यात आले. उपस्थित पत्रकार. विश्वास काळे, सुभाष वाघारे, संदीप जाधव हे उपस्थित होते.