ढाणकीत दुर्गामातेचे जल्लोशात आगमन.

प्रतिनिधी:प्रवीण जोशी,ढाणकी


जगत जननी अशी ओळख असलेली दुर्गा माता हे प्रत्येकाचे आराध्य दैवत. दुर्गा माताची स्थापना शहरात अनेक मंडळांनी केली आहे त्यामुळे सर्वत्र आनंदाच व चैतन्याचे व जल्लोशाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुर्गामातेच्या आगमनाची आज सकाळपासूनच भक्तामध्ये भक्तीमय धामधुम सुरू होती.
आपल्या दुर्गामातेच्या आगमनाचे जंगी स्वागत करण्यासाठी दुर्गा मंडळांनी तयारी केली असून स्थापने पूर्वी शहरातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून दुर्गा मातेचे जल्लोशात आणि भक्ती भावाने महिला मंडळांनी स्वागत केले.
पुढचे दहा दिवस सार्वजनिक दुर्गा मंडळाकडून कडून मुर्ती स्थापनेच्या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम दुर्गामाते समोर आरतीच्या ताला सुरामुळे सभोवतालचे वातावरण भक्तीमय व अपार श्रध्देत नाहून निघणार आहे.
यंदाचा नवरात्र उत्सव खुप विशे ष आहे.मागील दोन वर्षाच्या कोरोना संकटातून मुक्त होवून दुर्गा भक्तांच्या चेहऱ्यावर आनंदाचे फवारे उडतांना दिसत आहे.बाजारात मोठया साधारण व लहान दुर्गा माता मुर्तीची खरेदी करतांना दुर्गा भक्तांची गर्दी उसळली आहे. तर मंडपवाले ,मुर्तीकार व संबंधीत इतर व्यवसायीकांच्या धंदयात मोठी वाढ झाली आहे.10 दिवसाच्या दुर्गा मातेच्या मुक्कामात सार्वजनिक दुर्गा मंडळाकडून विविध सामाजीक उपक्रमासह सांस्कृतीक कार्यक्रमाची मेजवाणी ढाणकी करांना ऐकावयास व पाहण्यास मिळणार आहे.
2 वर्षापूर्वी कोरोना महामारीने सार्वजनिक जिवनाचा आनंद उत्साह हिरावून घेतला होता.अनेक निर्बंधांचा सामना करावा लागला.आता मात्र कोरोना महामारीमुळे लादण्यात आलेले कडक निर्बंध यंदा शिंदे सरकारने उठविल्यामुळे यंदाचा नवरात्र उत्सव सुरूवातीपासूनच धुम धडाक्यात साजरा होत आहे. दुर्गा मातेचे आगमण पहिल्या दिवशी अगदी थाटामाटात ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत शहराच्या मुख्य रस्त्याने मिरवणूक काढत जल्लोशात भक्ताकडून श्रध्दा पूर्वक जंगी स्वागत होत आहे.

चौकट – पोलीसांचा फौजफाटा ठिकठिकाणी तैनात,आगामी काळात दुर्गा माता स्थापनेपासून पुढील 10 दिवस नवरात्र उत्सव उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढाणकी शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे.काही गुन्हेगारावर पोलीस स्टेशनच्या हद्दीबाहेर जाण्याच्या नोटीसा बजावल्या तर अनेक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. दुर्गा भक्तांना आरती व इतर सांस्कृतीक कार्यक्रमाला भयमुक्त वातारणात बाहेर पडूण हजेरी लावता यावी म्हणून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला आहे.ठाणेदार प्रताप भोस ,पोलीस उपनिरीक्षक कपील मस्के हे शहरातील हालचालीवर बारकाईचे लक्ष ठेवीत आहेत.