
सुधारित कापूस आदर्श पद्धत प्रकल्प अंतर्गत ॲफ्रो आणि एलडीसी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या वाढोणा (बाजार)येथे कपाशी पिकावरील गुलाबी बोन्ड अळीचि कार्यशाळा घेण्यात आली यावेळी
खालील मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. गेल्या २ वर्षांपासून एलडीसी कंपनी सोबत गुलाबी बोंडअळी नियंत्रण “जागृती” कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
त्यानंतर स्वागत समारंभ झाला त्यानंतर प्रास्तविक
नंदकिशोर डेहणकर सर यांनी ॲफ्रो प्रकल्प कार्याची रूपरेषा तसेच BCSS प्रकल्प व त्याची संकल्पना स्पष्ट केली, कामगंध सापळे, पिवळे/निळे चिकट सापळे याचा वापर व फायदे सांगण्यात आले तसेच ते कमी खर्चात कसे बनवायचे याबद्दल माहिती दिली, हवामान बदल आणि त्याचे शेतीवर होणारे विपरीत परिणाम आणि त्यावरील उपाययोजना, जैविक कीटकनाशक जसे, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क व त्याचे फायदे याबद्दल शेतकऱ्यांना सांगितले. त्यानंतर मनीषा पाटील मॅडम कृषी अधिकारी पंचायत समिती राळेगांव यांनी कापूस पिकाची स्थिती आणि गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र, पिकावरील हल्ला आणि गुलाबी बोंडअळी यांत्रिक नियंत्रण, लेबल क्लेम माहिती याबद्दल संपूर्ण माहिती दिली.
शेरअली लालाणी उद्योजक, तथा सामाजिक कार्यकर्ते वाढोणा बाजार यांनी फेरोमोन ट्रॅप कसे वापरावे आणि ते प्रति एकर किती आणि कसे बसवावे याबद्दल एक डेमो देखील देण्यात आला. सापळे लावताना काय काळजी घ्यावी याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले. कापूस पिकांवर मोठ्या प्रमाणात रासायनिक फवारणीचे निसर्गावर आणि मानवी शरीरावर होणारे गंभीर परिणाम अधोरेखित करण्यात आले, एकापेक्षा जास्त कीटकनाशक मिश्रण करून वापरू नये आणि अती घातक कीटकनाशकांवर पूर्णपणे बंदी का घालावे यावर मार्गदर्शन करण्यात आले. किड सर्वेक्षण आणि पिकाची आर्थिक नुकसान पातळी, शत्रू कीड व मित्र कीड याची ओळख. मोनॉक्रोटोफोस बंदी व त्याचे पर्यावरण व मानवी आरोग्यावर होणारे परिणाम. रासायनिक कीटकनाशकाची हाताळणी व फवारणी करतांना घ्यावयाची काळजी माहिती व PPE KIT डेमो दाखवण्यात आला. कीटकनाशकांचा वापर, कीटनाशकांचे लेबल वरून विषारकतेचे ओळख. कीटकनाशकांच्या रिकाम्या डब्याची योग्य विल्हेवाट लावणे, बालमजुरी, महिलांचे हक्क आणि मजूर हक्काचे उल्लंघन, मजुरांचे आरोग्य आणि सुरक्षा याबाबत माहिती. त्यानंतर श्री. तुकाराम बदाडे (LDC कंपनी) यांनी एलडीसी कंपनी आणि तिच्या कार्याबद्दल माहिती दिली आणि कृषी क्षेत्र आणि व्यापारात त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल माहिती दिली.
यावेळी INMH05राळेगांव PU चे सर्व कृषीमित्र/सखी, यांनी कार्यक्रम यशस्वी करिता परीश्रम घेतले
कार्यक्रमाला गावातील प्रगतशील शेतकरी, महिला उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे एल डी सी कंपनी चे तुकाराम बदाडे, राळेगाव प. समिती कृषी अधिकारी मनीषा पाटील, जेंडर समिती सदस्य शेरअली लालानी, प्रवीण झोटिंग सरपंच टाकळी, रमेश आत्राम सरपंच आठमूर्डी, नंदकिशोर डेहणकर अफ्रो पीयू व्यवस्थापक राळेगाव, सौ. मंगला गुजरकर icrp उमेद, आदी. उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ज्ञानेश्वर बावणे यांनी केले.
