कारंजा येथे बक्षिस वितरण सोहळा संपन्न,सूर्योदय कराटे क्लब कारंजा घाडगे तर्फे कार्यक्रमाचे आयोजन.

:-

कारंजा घाडगे/ प्रतिनिधी

कारंजा (घा):- दिनांक २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सूर्योदय कराटे क्लब कारंजा घाडगे तर्फे कराटे काता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हॉकी चे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदनानिमित्त राष्ट्रीय क्रीडादिन हा संपूर्ण भारतात साजरा केला जातो.कराटे काता स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण दिनांक ४ सप्टेंबर रोजी करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन सूर्योदय कराटे क्लब कारंजा तर्फे कारंजा येथील कस्तुरबा महाविद्यालयात करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कस्तुरबा महाविद्यालयाच्या उप प्राचार्य संदीपा इप्पर व राजू जसुतकर होते तर प्रमुख उस्थिती म्हणून कारंजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार दारासिंग राजपूत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.सर्व उपस्थित मान्यवरांचे सूर्योदय कराटे क्लबच्या शिक्षका तर्फे पुष्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमानिमित्त संदिपा ईप्पर व राजू जसुतकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कराटे काता स्पर्धेतील सर्व विजयी विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन त्यांना गौरविण्यात आले.या कार्यक्रमा निमित्त खो – खो खेडाळू निकिता उईक यांचा सत्कार मुकेश ठाकरे सरांनी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पियूष रेवतकर यांनी केले तर प्रास्ताविक मुकेश ठाकरे यांनी केले. राष्ट्रगीता नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी कार्यक्रमाला दारासिंग राजपूत, संदीपा इप्पर, राजू जसुतकर, अण्णा गायकवाड, मनीषा सावरकर, तुषार बागडे,कुणाल दुर्गे, पिंटू सावरकर,संदीप काशीकर, मंगेश गाडरे, पियूष रेवतकर व कराटे क्लबचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक कार्यक्रमाला उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी कुणाल दुर्गे,संदीप काशीकर, मंगेश गाडरे, पिंटू सावरकर यांनी परिश्रम घेतले.