हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव
सततच्या ढगाळी वातावरणामुळे व अवकाळी पावसामुळे हरभरा उत्पादकाची चिंता वाढली



यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी साडेसात हजार हेक्टर वर सोयाबीनची पेरणी केली असून पाहिजे त्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन न होता एकरी दोन ते तीन क्विंटल झाल्याने सोयाबीन पिकांना शेतकऱ्यांची निराशा केली आहे त्यानंतर शेतकऱ्यांना खरिपाचे दुःख बाजूला सारून रब्बीची पेरणी केली यात मागील आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसाने व सततच्या ढगाळी वातावरणामुळे हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आणखी चिंता वाढली आहे.
मागील आठवड्याभऱ्यापासून अवकाळी पाऊस व सतत ढगाळी वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यावर एकापाठोपाठ एक संकट येत आहे यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले होते तर सोयाबीन पिकावर आलेल्या मोजाक रोगामुळे उत्पन्नात लक्षणीय घट झाली आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असतानाही मोठे हिमतीने शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून हरभरा पिकाची पेरणी केली हरभरा पिक अंकुरलेल्या अवस्थेत असताना मर रोगाने झाडे जळून जात असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.
कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन मर रोगाविषयी उपायोजना करून मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे हरभरा पिकाची बीज प्रक्रिया करून पेरणी केली मात्र तरीसुद्धा शेतातील हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे त्यामुळे दिवसेंदिवस हरभरा जळून खाक होत आहे असे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे

यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली मात्र सोयाबीन पिकावर आलेल्या माझ्या रोगामुळे उत्पन्नात लक्षणीय घट झाली असून एकरी एक ते दोन क्विंटल सोयाबीन चा उतारा मिळाला आहे सध्या स्थितीत रब्बी हंगामातील हरभरा पिकाची पेरणी केली असून पीक अंकुरल्याचे दिसून येत आहे मात्र हरभरा पिक मर रोगाने करपत आहे यावर कृषी विभागाने मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

पिक विमा मिळालाच नाही


खरीप हंगामातील कापूस सोयाबीन तुर पिकाची पेरणी केली असून या पिकांचा पिक विमा ही काढला असताना काही शेतकऱ्यांनी झालेल्या पीक नुकसानीचे पिक विमा कंपनीकडे क्लेमही केले असून अद्यापही पीक विमा कंपनीने मदत दिलेली नाही शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना पिक विम्याची मदत त्वरित देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे