
सहसंपादक. : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील सावरखेडा, वरध, वेडशी, विहीरगाव, रिधोरा परिसरातील जंगली जनावराच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांच्या कपासी, तुर व सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. सदर वरील संपूर्ण गावे जंगला लगत असल्याने येथील जंगली डुक्कर नीलगाय यांचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. हाता तोंडासी आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात जंगली जनावर नुकसान करत असल्याचे दिसून येत आहे.तर या परिसरामध्ये जंगली जनावरांचा धुमाकूळा मुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. सदर सावरखेड येथील शेतकरी हेमराज कुडमते यांचे शेत जंगला लगत असल्याने येथील या शेतकऱ्यांचे जंगली जनावरांनी कपासी व तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असल्याचे दिसून येत आहे. सदर या शेतकऱ्याकडे नऊ एकर शेती असून या शेतकऱ्यांचे अंदाजे चार ते पाच एकराचे नुकसान केले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. सदर या शेतकऱ्यांचे अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे दिसून येत आहे. तर या शेतकऱ्यावर आधिक कर्जाचा डोंगर असताना देखील हाता तोंडाशी आलेल्या पिकाचे जंगली जनावर नुकसान करत असल्याने पुन्हा या शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर चढत आहे सदर या परिसरातील होत असलेल्या नुकसानीचे वन विभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी येतील शेतकऱ्यांकडून होताना दिसत आहे.
