धुलीवंदनाच्या दिवशी गोटमार,आगळीवेगळी परंपरा जपत आहे बोरी वासीय

मारेगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या बोरी(गदाजी) येथे होलिका पर्वावर यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. व दिनांक 7 मार्च 2023 रोज मंगळवारला यात्रेला सुरुवात होत आहे. बोरी गदाजी येथील गोटमार यात्रेला अनेक वर्षापुर्वीपासुन परंपरा
असुन राज्यासह लगतच्या राज्यात ही यात्रा प्रसिद्ध आहे. गावाच्या
बाजूला लागूनच असलेल्या वाहणाऱ्या छोट्याश्या नदीत श्री गदाजी महाराज यांचे मंदिर असून धुलीवंदणाच्या दिवशी येथे यात्रेचे आयोजन कमेटी तर्फे करण्यात येते.

धुलीवंदनाच्या दिवशी येथील मंदिराच्या परिसरात सकाळी कबड्डी
खेळल्या जाते जो गडी शेवटी बाद होतो त्या गाड्याची (मढ)मिरवणुक संपूर्ण गावासभोवती वाज्या गाज्यात काढल्या जाते व त्याला मंदिर परिसरात आणल्या जाते. त्या नंतर प्रसिद्ध गोटमार खेळल्या जाते.मंदिरा शेजारी मचान उभारून त्यावर दगडासह काही भाविक असतात.
ا…
मचानीवर असलेले भाविक जमीनी वरील भाविकांवर दगडाने गोटमार करतात.तर जमीनी वरील भाविक माळ्यावरील भाविकावर दगडाने गोटमार करीत असुन जवळपास सुमारे 1 ते 2 तास हा खेळ सुरू असतो.जेव्हा एखाद्या भक्ताला दगड लागुन जखमी होऊन भक्त जमिनीवर कोसळतो तेव्हा हा खेळ थांबवुन जखमी भक्ताला मंदिरात घेवुन जातात. त्यानंतरच तो जखमी भक्त बरा होत असल्याची माहीती गावकऱ्याकडून प्राप्त होते.
गोटमारची परंपरा जोपासत ही यात्रा कोरोणाचा कालावधी सोडला तर सातत्याने भरवल्या जात आहे. बुधवार दिनांक 1 मार्च 2023 ला मंदिरात घटस्थापणा करण्यात येणार आहे. तर मंगळवार दिनांक 7 मार्च 2023 रोजी सकाळी 8 होळकर खेळ (मढ) रंगपंचमी मिरवणुक व त्या नंतर सकाळी 11 वाजता भव्य गोटमार व दुपारी 2 वाजता दहीहंडी आणी गोपाल काला दुपारी 4 वाजता महाराजांच्या पालखीची मिरवणूक आहे.
दिनांक 10 मार्च 2023 रोज शुक्रवारला पाखड पुजा करण्यात येणार आहे.या दरम्यान यात्रेच्या आयोजनाची तयारी पुर्ण झाली असुन भाविकांनी दर्शनासाठी व यात्रेचा लाभ घेण्याचे विश्वस्तांनी आवाहन समस्त ग्रामवासी बोरी, गोटमार खेळाडू बोरी (गदाजी), ता.मारेगांव, जि. यवतमाळ यांनी केले आहे.