डेकोरेशनचे साहित्य चोरणारा व घेणाऱ्याला वडकी पोलिसांनी ठोकले बेड्या

        राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर 

राळेगाव तालुक्यातील खैरी येथील एका डेकोरेशन व्यवसाईकाच्या गोडावूनमधून साहित्य चोरणाऱ्या दोघांना वडकी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी गेलेले साहित्य जप्त करण्यात आले. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.रमेशअजाब आत्राम चोरणाऱ्याचे, तर विकत घेणाऱ्याचे नाव विलास सर्जू वाईकर असे आहे.

खैरी येथील राहुल वडपल्लीवार यांच्या वडकी रोडवरील गोडावून असून ते आपल्या गोडाऊनकडे गेले असता त्यांना गोडाऊनच्या शटरचे कुलूप तोडून दोघे इसम गोडाऊन मधून डेकोरेशनचे साहित्य चोरी करताना दिसले. तेव्हा राहुल वडपल्लीवार यांना बघून त्या चोरट्यांनी पळ काढला मात्र त्यातील एकाला त्यांनी पकडले व पोलीस स्टेशनला चोरीची फोन द्वारे सूचना केली. तेव्हा वडकी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले . वडकी पोलिसांनी तपासा चक्र वेगाने फिरवून चोरीचा माल घेणाऱ्या वणी येथील भंगार विक्रेता विलास सरजू वाईकर त्याच्याकडून चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले. गोडाऊन मधील जवळपास ११ हजार रुपये किमतीचे लोखंडी पाईप चोरुन नेण्यात आले होते.
वडकी पोलिसात तक्रार दिली असता पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवून माल चोरणारा व माल घेणारा या दोघांनाही ताब्यात घेऊन विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला व पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे.