वीज पडून एक बैल जागीच ठार तर एक बैल गंभीर जखमी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील आटमुर्डी येथील अल्प भूधारक शेतकरी शुभम रमेश पाटील शेत सर्वे नंबर११७/२ यांच्या शेतात ७ जुनं रोजी दुपारच्या सुमारास आकस्मित वीज पडून एक बैल जागीच ठार तर एक बैल गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर या परिसरात विजेच्या गडगडासह वादळी पाऊस आल्याने येथील शुभम रमेश पाटील या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.तर पेरणी टोमणीच्या तोंडावर या शेतकऱ्यांचा बैल वीज पडून जागीच ठार झाल्याचे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सदर वीज पडून ठार झालेल्या बैलांची किमती अंदाजे एक लाख पन्नास हजार रुपये होती तर जखमी झालेल्या बैलांची किमती अंदाजे तीतकीच असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली असून येथील शेतकरी शुभम रमेश पाटील यांनी विज पडून ठार झालेल्या बैलाची नुकसान भरपाई देण्यात यावी असे मागणी शेतकऱ्यांनी केली आहे