
सहसंपादक : रामभाऊ भोयर
न्यू इंग्लिश हायस्कूल येथे दिनांक 27 ऑगस्ट रोजी टी. डी.आर. एफ… (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग ) यांच्या युनिट ने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना संकट काळात अचानक आग लागणे,भुकंप होणे, तसेच वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती काळात विद्यार्थ्यांनी कशी काळजी घ्यावी.व स्वतःची तसेच इतरांचे जीवन कसे वाचवावे याबद्दल प्रत्यक्ष मॉक ड्रिल सादर केले.यावेळी शाळेतील 1680 विदयार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन याबद्दल माहिती दिली. या सर्व आपत्ती व्यवस्थापन माहिती बद्दल शाळेतील विद्यार्थ्यां मध्ये मोठा उत्साह दिसून आला .या आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळे करिता शाळेचे मुख्याध्यापक विजय कचरे, उपमुख्याध्यापक सुरेश कोवे, पर्यवेक्षक सूचित बेहरे तसेच शाळेतील आपत्ती व्यवस्थापन प्रभारी शिक्षक तसेच शाळेतील इतर सर्व शिक्षक,शिक्षिका व विद्यार्थी सहकार्य केले.
