

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
अगदी काहीच दिवसांपूर्वी त्याचा जन्म झाला… नव्या पाहुण्याच्या आगमनाने आई-वडिलांच्या आनंदाला पारावार राहिला नाही; मात्र तो आनंद काही दिवसांपुरताच मर्यादित ठरला…. काळ आणि वेळ सोबत आल्याने विद्युत तारेचा जोरदार शॉक लागून तो चिमुकला गतप्राण झाला. आणि धपकन खाली पडला यामुळे बाळाच्या विरहात आसक्त झालेली त्याची आई उदास चेहऱ्याने अक्षरशः त्याला भेटायला तळमळू लागली पण तिला भेटता आले नाही कारण एकीकडे कुत्र्यांचा कल्लोळ तर दुसरीकडे नागरिकांची वर्दळ त्यामुळे त्या बाळाला भेटण्यासाठी तिला केविलवाण्या नजरेने प्रतीक्षा करावी लागली…
राळेगाव शहरातील क्रांती चौक येथे दिं ४ फेब्रुवारी रोज शनिवारला सकाळी ७:३० वाजता कुण्याही माणसासोबत नव्हे; तर माकडासोबत हा प्रकार घडला. मायचे आगळेवेगळे प्रेम पाहून यावेळी गतप्राण झालेल्या पिलासोबत त्याच्या अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. झाले असे की, नित्यनेमाप्रमाणे
माकडांची मोठी टोळी अन्नपाण्याच्या शोधात बागडत असताना असलेल्या क्रांतिचौक येथे पिंपळाचे झाड आहे बाजूला मोठी विद्युतट्रान्सफॉर्म आहे.ही माकडे नेहमीच अन्न पाण्याच्या शोधात येत असता आणि या पिंपळाच्या झाडावर ते खेळत बागडत असतात मात्र आज खेळत बागडत असताना एका लहान वानराच्या पिलाला विद्युत प्रवाहाचा जबर शॉक लागला आणि ते खाली पडले या पडून असलेल्या पिलाला त्याच्या आईने त्याला भेटण्यासाठी अक्षरश: अश्रू ढाळत खुप प्रयन्त केला परंतु ती भेटू शकली नाही या शेवटच्याक्षणी तरी लेकरांची भेटघेण्यासाठी तळमळत होती ती या दुकानावरून त्या दुकानावरून येत होती मात्र एका बाजूला कुत्र्यांचा कल्लोळ तर दुसरीकडे नागरिकांची वर्दळ त्यामुळे ती तिच्या लेकराजवळ पोहचू शकली नाही .ती बराच वेळ त्याच्याकडे ती उदास नजरेने पाहत राहिली. हा क्षण अन् दुःखद चित्र पाहून ये-जा करणाऱ्या माणसांनीही दुःख व्यक्त करत जणू
माकडिणीच्या पिलाला श्रद्धांजली अर्पण केली आणि ती तिथून निघून गेली.
शहरातील नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया
शहरात वानराच्या पिलांच्या दुर्दैवी मृत्यूने क्रांती चौकातील असलेल्या नागरिकांनी हळहळ व्यक्ती केली असून ही वानराची विद्युतप्रवाहाने मरण्याची ही पहिली घटना नसून चक्क चौथी पाचवी घटना आहे. क्रांती चौक येथे असलेल्या ट्रान्सफार्म च्या आजूबाजूला असलेल्या पिंपळाच्या झाडाच्या फांद्या असून या फांद्यांवर ही वानर खेळतात मात्र या खेळीण्यात त्याना विद्युत प्रवाह लागून जीव गमवावा लागतो या वानराच्या जीव जाण्यामागे ही विद्युत वितरण कंपनी जबाबदार असल्याचे नागरिकाकडून बोलल्या जात असून विद्युत वितरण कंपनीने ट्रान्सफार्मला लागून असलेल्या पिंपळाच्या झाडाच्या फांद्या तोडाव्यात अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.
