

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज १०वा स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनानिमित्त राज्यभरातील शिवसैनिकडून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. शिवाय, शिवसैनिकांनी शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावरही येण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल स्मृतीस्थळी जाऊन दर्शन घेत शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहली आहेत.
तमाम शिवसैनिक आपल्या लाडक्या ‘साहेबां’ना घरातून, कार्यालयातून आणि मनामनातून ‘जय महाराष्ट्र’अशी साद घालत मानवंदना देत आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणावर फक्त एकाच माणसाचा प्रभाव’सन १९६९ ते २०१२ पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणावर फक्त एकाच माणसाचा प्रभाव होता. १९९१ ते २०१२ पर्यंत देशातील हिंदू समाजाचे भवितव्य केवळ एका व्यक्तीच्या हाती होते. ती व्यक्ती म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी मराठी मन तर जपलेच होते, पण त्याचवेळी देशात हिंदुत्वाचा वनव्हा देखील चेतविला होता’, अशी भावना सामनाच्या जनमानसात निर्माण केली होती, अश्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १०व्या स्मृतिदिन आज पहाटे नगर सेवा समितीच्या वतीने जलाभिषेक व पुष्प माला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी माजी सैनिक नामदेवराव शेलवडे, राजेंद्र साखरकर, राजु तुराणकर, मंगल भोंगळे, जनार्दन थेटे, राहुल झट्टे उपस्थित होते.
